दाढी आणि मिशीचे पांढरे केस काळे करण्याच्या खास ट्रिक By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:10 AM 2018-11-23T11:10:46+5:30 2018-11-23T11:17:38+5:30
डोक्यावरचं एक केस जरी पांढरं झालं तरी अनेकांची झोप उडते. याकडे दुर्लक्ष केलं तर ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हे पांढरे केस अधिक हैराण करतात. कारण वाढत्या वयामुळे किंवा वेगवेगळ्या कारणांनीही केवळ डोक्यावरचेच नाही तर दाढी-मिशीचेही केस पांढरे होऊ लागतात. याने सौंदर्यात अडसर निर्माण होते.
ही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक पुरुष हेअरडायचा वापर करतात. अलिकडे तर हेअरडाय वेगवेगळ्या रंगांमध्येही उपलब्ध आहेत. पण ते वापरुनही केसांना नैसर्गिक रंग मिळत नाही. यावर योग्य उपाय म्हणजे नैसर्गिक पद्धतीने दाढी-मिशीचे केस काळे करणे. आम्ही तुम्हाला याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.
१) दाढी आणि मिशीचे केस पांढरे होऊ नये यासाठी केसांना रोज गायीच्या दुधापासून तयार लोण्याने मसाज करा. याने दाढी आणि मिशीचा नैसर्गिक रंग कायम राहतो.
२) थोडं पाणी घेऊन त्यात २ चमचे साखर घाला. त्यात काही थेंब लिंबाच्या रसाचे टाकून चांगलं मिश्रित करा. हे मिश्रण दाढी आणि मिशीच्या केसांना रोज लावा. काही दिवसातच केस काळे होऊ लागतील.
३) तुरीच्या डाळीनेही केसांना नैसर्गिक रंग मिळण्यास मदत होते. यासाठी तुरीच्या डाळीचं पावडर आणि बटाटा यांचं मिश्रण तयार करा. हे पेस्ट दाढी आणि मिशीच्या केसांना लावा. याने चांगला फायदा होईल.
४) थोडी कच्ची पपई मिक्सरमधून बारीक करा. आता यात चिमुटभर हळद आणि एक चमचा कोरफडीचा गर मिश्रित करा. ही पेस्ट दाढी आणि मिशीच्या केसांना लावा.
५) खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ते टाकून चांगल्याप्रकारे उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर रोज दाढी आणि मिशीच्या केसांना लावा. काही दिवसांनी केस काळे होऊ लागतील.