उन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 06:04 PM2018-04-26T18:04:02+5:302018-04-26T18:04:02+5:30

आपण उन्हाळ्यात दिवसा त्वचेची काळजी घेतोच, पण रात्रीही त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्यात त्वचेला जास्त हानी होते म्हणून रात्रीच्या वेळी काळजी घेणं महत्वाचं असतं.

१) चेहरा साबणाने धुण्यापेक्षा फेसवॉशने धुवा. त्यामुळे चेहरा टवटवीत दिसेल.

२) चेहऱ्यावर मुरूमं असल्यास बेसनाचं पीठ किंवा लिंबू चोळा. जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही.

३) रात्री झोपताना किमान एक ग्लास पाणी किंवा लिंबू सरबत प्या. जेणेकरून तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल व सकाळी उत्साह राहील.

४) उष्णतेचा त्रास जास्त होत असल्यास रात्री झोपताना फळे खा.

५) त्वचेवर कमीत कमी क्रिम्स लावा, जेणेकरून तुमच्या त्वचेला हानी होणार नाही.