In pics amazing health benefits and beauty tips of apple cider vinegar
सफरचंदाच्या व्हिनेगरचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्... By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 07:36 PM2019-06-10T19:36:38+5:302019-06-10T19:41:06+5:30Join usJoin usNext त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतं अॅपल साइडर व्हिनेगर म्हणजेच सफरचंदाचं व्हिनेगर. तुम्हाला बाजारात अगदी हे व्हिनेगर अगदी सहज उपलब्ध होतं. जेवण तयार करताना अनेकदा याचा वापर करण्यात येतो. व्हिनेगर पदार्थाची चव वाढविण्याचं काम करतं. एवढचं नाही तर आरोग्यासाठी हे व्हिनेगर अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु आरोग्याव्यतिरिक्त या अॅपल साइड व्हिनेगरचे त्वचा आणि केसांसाठी अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया सौंदर्या वाढविण्यासाठी असलेले सफरचंदाच्या व्हिनेगरचे फायदे...1. फेस टोनर त्वचेचं पीएच लेव्हल असंतुलित झाल्याने अनेक त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यापासून सुटका करण्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगरचा टोनर म्हणून वापर करू शकता. त्यासाठी एक चमचा व्हिनेगरमध्ये 2 चमचे पाणी एकत्र करून टोनरप्रमाणे वापर करू शकता. 2. सन टॅनिंगपासून सुटका उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या सर्वात कॉमन समस्यांपैकी एक समस्या म्हणजे, सन टॅनिंगची. यापासून सुटका करण्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगर तुमच मदत करेल. हे एखाद्या एस्ट्रिजंटप्रमाणे काम करतं. एका बाउलमध्ये सम प्रमाणात थंड पाणी आणि सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा. टॅन झालेल्या स्किनवर याचा वापर करा. 3. अॅक्ने दूर करा चेहऱ्यावरील अॅक्ने दूर करण्यासाठीही सफरचंदाचं फायदेशीर ठरतं. त्यासाठी थंड पाण्यामध्ये एकत्र करून अॅक्ने असलेल्या त्वचेवर लावा. काही वेळ ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. 4. पायांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पायांना दुर्गंधी येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका करण्यासाठी एका बादलीमध्ये थंड पाणी घ्या. त्यामध्ये 2 ते 3 चमचे सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा. या पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवा. 5. हेअर क्लींजर डोक्याची त्वचा डिटॉक्स करण्यासाठी आणि केस मुलायम, शायनी करण्यासाठी अनेकदा शॅम्पूचा उपयोग होत नाही. अशातच सफरचंदाचं व्हिनेगर वापरणं फायदेशीर ठरतं. एक कप पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे व्हिनेगर एकत्र करा. शॅम्पू केल्यानंतर केसांना कापसाच्या मदतीने लावा. थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीBeauty TipsSkin Care TipsHair Care Tips