सेल्फीचे साईड इफेक्ट्स ! धोके वाचाल, तर सेल्फीला राम राम कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 17:43 IST2019-05-15T17:37:53+5:302019-05-15T17:43:26+5:30

माणसाच्या व्यक्तीमत्वात चेहऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं अनेकांना वाटतं. सेल्फी काढण्याच्या सवयीचा थेट परिणाम माणसाच्या चेहऱ्यावरच होतो.

सेल्फी काढताना मोबाईलमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात. हे त्वचेसाठी हानीकारक असतात.

सेल्फी काढताना निघणाऱ्या रेडिएशन सनस्क्रीनदेखील रोखू शकत नाहीत. रेडिएशन थेट चेहऱ्यावर येत असल्यानं त्वचेवर विपरित परिणाम होतो.

सेल्फी काढताना मोबाईलमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. तुमची त्वचेचं वय वाढतं. त्यामुळे तुम्ही म्हातारे होत आहात, असं वाटू लागतं.

मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम त्वचेतील डीएनएवरदेखील होतो. पेशींच्या पुनरुज्जीवन क्षमतेवर रेडिएशनचा अतिशय प्रतिकूल परिणाम होतो.

त्वचेवरील पेशी ठराविक कालावधीनंतर मृत पावतात. त्यानंतर त्याच जागी नव्या पेशी येतात. या प्रक्रियेमुळे त्वचेचा तजेला कायम राहतो. या प्रक्रियेला पेशींचं पुनरुज्जीवन म्हणतात. सेल्फीच्या अतिरेकामुळे या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतात.

सेल्फीमुळे अनेक आठवणी टिपता येतात. पण त्याला काही मर्यादा असावी. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.