Side effects of sleeping with makeup
मेकअप रिमूव्ह न करता झोपत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:38 PM2019-06-12T19:38:37+5:302019-06-12T19:44:30+5:30Join usJoin usNext एखादी पार्टी किंवा फंक्शनमधून उशीरा घरी आल्यानंतर थकल्यामुळे मेकअप रिमूव्ह न करता निघून जातात. अनेकदा जेव्हा तुम्ही हेव्ही मेकअप करत नाही. तेव्हाही मेकअप हटवणं गरजेचं वाटत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? असं केल्यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या स्किनला नुकसान पोहोचवत आहात. मेकअप तसाच ठेवून झोपण तुम्हाला महागात पडू शकतं. दिवसभर आपली स्किन प्रोटेक्शन मोडमध्ये असते. दिवसभरात स्किन सेल्स प्रदूषण आणि घातक यूव्ही किरणांशी लढत असतात. पण रात्री जेव्हा तुम्ही आराम करत असता. तेव्हा स्किन रिपेअर मोडमध्ये असते. अशातच जर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल तर स्किनसाठी घातक ठरू शकतं. तुम्हाला हे माहीत असेलच की, हेल्दी स्किनसाठी स्किन पोर्स ओपन राहणं गरजेचं असतं. पोर्समध्ये जर धूळ-माती जमा झाली तर ती स्क्रब करून स्वच्छ करणं गरजेचं असतं. रात्रभर मेकअप तसाच ठेवून झोपलं तर त्यामुळे स्किन पोर्स ब्लॉक होतात. मेकअप आपल्या स्किनमध्ये मॉयश्चर शोषूण घेतात आणि त्यामुळे स्किन ड्राय होते. मेकअप हटवल्यामुळे आपल्या स्किनला ताजी हवा मिळते आणि स्किन रिफ्रेश्ड राहते. संपूर्ण दिवसाचं प्रदूषण आपल्या स्किनवर चिकटतं. जर तुम्ही हे तसचं ठेवून झोपत असाल तर चेन रिअॅक्शनसोबत स्किनला नुकसान पोहचू शकतं. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सSkin Care TipsBeauty Tips