There are many benefits from lemon water bath
लिंबाचे पाणी प्यायल्यानेच नाहीतर आंघोळ केल्यानेही होतात फायदेच फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 10:43 AM2019-10-12T10:43:02+5:302019-10-12T10:49:54+5:30Join usJoin usNext लिंबाचा आहारत समावेश केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. एवढचं नाहीतर लिंबू त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतं. वजन कमी करण्यासोबतच ताप किंवा वायरल इन्फेक्शनवर उपाय म्हणून लिंबू फायदेशीर ठरतं. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. पण तुम्हाला माहीत आहे का? लिंबाच्या सेवनानेच नाहीतर लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यानेही आपल्याला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत... तेलकट त्वचेसाठी फायदेशीर... जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि अनेक उपाय करून कंटाळला असाल तर आंघोळ करण्याआधी पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करा. सतत एक आठवडा असं केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. फ्रेशनेससाठी लिंबू करतं मदत पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून आंघोळ केल्याने थकवा दूर होऊन तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होते.शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी काही लोकांच्या शरीरातून घामाचा दुर्गंध येतो. यामुळे अनेकदा हैराण व्हायला होतं. लिंबामध्ये अॅसिडिक तत्व असतात. तसेच यामध्ये अॅन्टीसेप्टिक गुणधर्मही असतात. जे शरीराचा दुर्गंध दूर करण्यासाठी मदत करतात. मुलायम त्वचेसाठी करतं मदत लिंबामध्ये असलेलं सॅट्रिक अॅसिड त्वचेवर एखाद्या ब्लीचप्रमाणे काम करतात. यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. तसेच त्वचा चमकदार होते. वाढत्या वयाची लक्षण होतात दूर लिंबू पाण्याने सतत आंघोळ केल्याने शरीरावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच कमी वायत दिसणारी वाढत्या वयाची लक्षणंही दूर होतात. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीSkin Care TipsBeauty TipsWinter Care Tips