tips to get better result by scrubbing your skin
स्क्रब करताना ही काळजी घ्या; अन्यथा त्वचेला पोहचू शकतं नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 04:32 PM2018-09-16T16:32:09+5:302018-09-16T16:38:07+5:30Join usJoin usNext त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी स्क्रब करण्यात येतं. परंतु, स्क्रब करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. नाहीतर त्वचेला गंभीर नुकसान पोहोचू शकतं. अनेकदा स्क्रब करणं हे त्वचेसाठी नुकसान पोहोचवणारं असतं. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करणं त्वचेला नुकसान पोहचवू शकतं. जर तुमची त्वचा सामान्य प्रकारची असेल तर आंघोळ करताना माइल्ड फेसवॉशने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर स्क्रब चेहऱ्यावर लावा. फार जास्त स्क्रब घेऊ नका आणि चेहऱ्यावर स्क्रब लावताना सर्क्युलन मोशनमध्ये चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरली डेड स्किन सेल्स हटवण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी पील-ऑफ जेलचा वापर करण्यात येतो. हा पील-ऑफ मास्क चेहऱ्यवरील मृत पेशी आधीच काढून टाकतो. त्यामुळे त्यानंतर स्क्रब करणं त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं. स्किन लाइटनरचा वापर केल्यानंतर स्क्रबचा वापर करणं टाळावं. स्किन लाइटनरमध्ये अस्तित्वात असलेले केमिकल्स त्वचेला नुकसान पोहोचवतात. अशातच स्क्रब केल्यामुळे त्वचेला सूज येणे किंवा इन्फेक्शन होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. टॅग्स :ब्यूटी टिप्सBeauty Tips