Tips to making pink lips
काळे ओठ गुलाबी करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत! By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:19 PM2019-01-10T17:19:55+5:302019-01-10T17:26:40+5:30Join usJoin usNext थंडीमध्ये ओठ कोरडे पडले आहेत का? किंवा ओठांची त्वचा काळवंडली आहे का? अनेकदा ओठांचा गुलाबी रंग जपण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे ओठांचं सौंदर्य नाहीसं होतं. जाणून घेऊया ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी काही टिप्स जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर आजपासून थांबवा. कारण धुम्रपान केल्यामुळे ओठांचा गुलाबी रंग नाहीसा होऊन ओठांची त्वचा काळवंडते. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर व्हॅसलिन किंवा लिंबाचा रस लावून झोपा. एसपीएफ 15 वॅल्यू असलेला लिप वापरणं फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर दिवसभर 8 ग्लास पाणी अवश्य प्या. सकाळी दात घासल्यानंतर ओठांवर हलक्या हाताने ब्रश फिरवा. असे केल्याने ओठांवरील मृत पेशी निघून जातील आणि ओठांचा गुलाबी रंग टिकून राहील. जेव्हाही तुम्ही लिपस्टिक्स लावत असाल त्यावेळी कंसिलर लावा, त्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करा. यामुळे ओठ काळे दिसणार नाहीत आणि लिपस्टिकचा लूकही चांगला दिसण्यास मदत होईल. टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सSkin Care TipsBeauty Tips