Trendy shoulder length hair styles for girls
कोणती हेअर स्टाइल करावी? या प्रश्नात असाल तर हे ८ ट्रेन्डी Haircuts ट्राय करा! By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 03:28 PM2019-01-22T15:28:14+5:302019-01-22T15:33:08+5:30Join usJoin usNext हे तर सर्वांनाच मान्य करावं लागेल की, आपली हेअर स्टाइल आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. अनेकदा चांगले कपडे परिधान केले, पण हेअर स्टाइल चांगली नसेल तर सगळ्या लूकवर पाणी फेरलं जातं. अनेकदा मुलींच्या हे लक्षात येत नाही की, त्यांना कोणती हेअर स्टाइल चांगली दिसेल. पण आम्ही तुमच्यासाठी हेअर स्टाइलचे काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा आहे त्यानुसार तुम्ही यातील हेअर स्टाइल ट्राय करु शकता. 1. Medium Length With Layers - या हेअर स्टाइलने तुम्हाला Glamorous लूक मिळेल. मीडियम लेंथच्या हेअर स्टाइलने केसांची फार आकर्षक ठेवण होते. 2. Medium Length With Volume And Bangs - या हेअर स्टाइलमध्ये केसांना अनेक लेअर्समध्ये कापलं जातं. त्यामुळे चेहऱ्यावर एक नवीन शेप दिसायला लागते. पातळ केस असलेल्या मुलींवर ही हेअर स्टाइल उठून दिसेल. 3. Medium Length Straight Blunt Lob - सेक्सी आणि हॉट लूक मिळवण्यासाठी ही हेअर स्टाइल करायला हवी. महत्त्वाची बाब म्हणजे अशाप्रकारची हेअर स्टाइल कोणत्याही चेहऱ्याला सूट होते. 4. Medium Length With Messy Waves - रफ-टफ लूक ठेवणाऱ्या मुलींसाठी ही हेअर स्टाइल एक चांगला पर्याय आहे. या हेअर स्टाइलची खासियत म्हणजे तुम्हाला सतत केस सावरत बसण्याची गरज पडणार नाही. 5. Medium Length With Center Part - या हेअर स्टाइलमध्ये तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स उठून येतात. त्यामुळे तुम्ही अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाल. 6. Medium Length Inverted Bob - या हेअर स्टाइलमध्ये तुमचे कसं पुढे लांब आणि मागे छोटे ठेवले जातात. त्यामुळे तुम्हाला हटके लूक मिळतो. फॅशनेबल दिसण्यासाठी हा लूक फायदेशीर ठरतो. 7. Medium Length With Blown Out Layers - Volume आणि Bouncy केसांसोबत हा हेअर कट तुम्हाला एक सौज्वळ लूक देतो. ही हेअर स्टाइल जास्तीत जास्त मुलींना हवी असते. 8. Medium Length With Blunt Fringe Bangs - ही हेअर स्टाइल तुम्हाला सेक्सी आणि क्लासी लूक देते. कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणाऱ्या महिला ही हेअर स्टाइल करतात. टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सHair Care TipsBeauty Tips