चेहऱ्यावरील डाग आणि ब्लॅकेड्सच्या समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 02:21 PM 2018-09-29T14:21:43+5:30 2018-09-29T14:26:05+5:30
जर तुम्हीही तुमच्या ऑयली स्कीनच्या प्रॉब्लेम्समुळे त्रस्त झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही फेसपॅक सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरील डाग आणि इतर समस्या दूर करू शकता.
मक्याच्या पिठापासून तयार करण्यात आलेला फेसपॅक ऑयली स्कीनसाठी फायदेशीर ठरतो. कारण हे पीठ चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑइल दूर करते. त्याचप्रमाणे यामध्ये असतित्वात असलेले व्हिटॅमिन-सी चेहऱ्यावरील कोलेजन वाढवते.
जर तुमच्या चेहऱ्याची स्कीन ड्राय असेल तर त्यासाठी तुम्ही मक्याच्या पिठापासून तयार करण्यात आलेला फेसपॅक लावू शकता. त्यामुळे चेहरा मुलायम होण्यास मदत होते.
नॉर्मल स्कीनच्या तुलनेत ऑयली स्कीन असणाऱ्यांना ब्लॅकहेड्सची समस्या अधिक जाणवते. या समस्यांपासून सुटका करण्यासाठी एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा कार्नस्टार्च एकत्र करून पेस्ट तयार करा. ब्लॅकहेड्सवर लावा.
त्वचा उजळण्यासाठी मक्याच्या पिठामध्ये दूध मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावा. असं केल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मक्याच्या पिठाचा ब्लीच म्हणून वापर करा. त्यासाठी एक चमचा कॉर्नस्टार्च, एक चमचा हळद, एक चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण जवळपास 15 मिनिटांपर्यंत स्कीनवर लावून ठेवा. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल.
सनबर्नपासून स्कीनचं रक्षण करण्यासाठी तुम्ही कॉर्नस्टार्च आणि दही मिक्स करून स्कीनवर लावू शकता. यामुळे स्कीनवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल.