मांसाहार करावा की करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मांसाहार काय आणि शाकाहार काय, दोन्ही प्रकारच्या अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र मांसामध्ये असणाºया काही घटकांमुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्याउलट शाकाहारी अन्न न केवळ पचायला सोपे तर त्याचे अनेक आरोग्य लाभदायक फायदे आहेत. ब्लड प्रेशर नॉर्मल...शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते. तरीही, आपण भाज्या चटकदार होण्यासाठी जास्त प्रमाणात मीठ वापरतो. पण ते टाकू नये. कारण, त्यामुळेच सर्व आजारांना आमंत्रण मिळते.विषाक्त पदार्थ जातील बाहेर...मांसाहारी पदार्थामध्ये विषाक्त घटक असतात. पण, शाकाहाराने हे घटक बाहेर निघून जातात. कधीकधी प्राण्यांना हार्माेन्ससाठी इंजेक्शन दिले जातात. या इंजेक्शनमधील घटकांमुळे शरीरातील पचनशक्तीला त्रास होतो.वजन घटवण्यास मदत...शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने जास्त वजन वाढत नाही. शाकाहारी पदार्थांत कॅलरीज आणि फॅट कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जर वजन आपण घटवू इच्छितो तर पालेभाज्या खाण्यास सुरूवात करावी. म्हणजे फार लवकर वजन घटण्यास मदत होईल.