Winter skin care tips 5 amazing uses of cold cream to try this season
थंडीमध्ये कोल्ड क्रिमच्या सहाय्याने मिळवा परफेक्ट ग्लोइंग त्वचा By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 05:21 PM2019-01-15T17:21:05+5:302019-01-15T17:24:02+5:30Join usJoin usNext चेहरा आणि हातांच्या त्वचेव्यतिरिक्त ओठांनाही कोल्ड क्रिम लावता येते. ओठांची त्वचा शरीराच्या त्वचेच्या तुलनेत अधिक सेंसिटिव्ह असते. थंडीमध्ये ओठांची त्वचा संपूर्ण शरीराच्या त्वचेच्या तुलनेमध्ये अधिक सेंसिटिव्ह होते. थंडीमुळे सर्वातआधी ओठांची त्वचा कोरडी होते. त्यामुळे प्रत्येक तासाभराने ओठांवर कोल्ड क्रिम अप्लाय करा. थंडीमध्ये हाताचे कोपरे आणि गुडघ्यांची त्वचा कोरडी पडते आणि मृत पेशी जमा झाल्यामुळे काळवंडते. थंडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमुळे हे लक्षात येत नाही. परंतु योग्य काळजी घेतल्याने ही स्किन सॉफ्ट होते. रात्री कोल्ड क्रिम लावून झोपणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. काही दिवस सतत असं केल्याने ही क्रिम त्वचा रिपेअर करून नैसर्गिक पद्धतीने सॉफ्ट तयार करण्यास मदत करते. मेकअप रिमुव्हर जर संपलं असेल तर त्याऐवजी तुम्ही कोल्ड क्रिमचा वापर करू शकता. चेहऱ्यावर कोल्ड क्रिम लावल्याने थोड्या वेळासाठी तसचं ठेवा त्यानंतर कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. संपूर्ण मेकअप निघून जाण्यास मदत होईल. पायांच्या टाचांना पडणाऱ्या भेगा दूर करण्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रिम्सचा वापर करण्यात येतो. दररोज किमान 2 ते 3 वेळा कोल्ड क्रिम पायांच्या टाचांवर लावल्याने भेगा दूर होण्यास मदत होते. कोल्ड क्रिम टाचांची त्वचा रिपेअर करून सॉफ्ट करते आणि यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्सही होत नाहीत. टॅग्स :त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीब्यूटी टिप्सSkin Care TipsWinter Care TipsBeauty Tips