१४९ वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्लभ योग: ११ राशींवर महाकृपा, दुप्पट लाभ; भरघोस नफा, वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:17 IST2025-02-20T11:56:45+5:302025-02-20T12:17:25+5:30
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला जुळून येत असलेल्या दुर्मिळ आणि अद्भूत शुभ योगावर नेमक्या कोणत्या राशींना महादेवाच्या कृपेने सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

Mahashivratri 2025: २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येणार आहेत. शुक्र ग्रह उच्च राशी मीन राशीत विराजमान आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. यासोबतच, मीन राशीत शुक्र राहु युती योग जुळून आला आहे. तसेच सूर्य आणि शनि ग्रहांची युती कुंभ राशीत होत आहे. काही मान्यतांनुसार सूर्य आणि शनि पिता पुत्र मानले गेले आहेत.
बुध कुंभ राशीत विराजमान स्थित आहे. त्यामुळे सूर्य, बुध आणि शनि यांचा त्रिग्रही योग जुळून आलेले आहे. तसेच सूर्य बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. तसेच महाशिवरात्रीला चंद्र याच राशीत असणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत असल्याने शश राजयोग जुळून आला आहे.
काही दाव्यांनुसार, असा योगायोग १८७३ मध्ये घडला होता आणि सुमारे १४९ वर्षांनी २०२५ मध्ये घडणार आहे. या दिवशी शिव योग, सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीत मार्गी झाला आहे. गुरु आणि बुधाचा केंद्र योग जुळून येत आहे. तसेच विपरीत नामक राजयोग जुळून येत आहे. या सर्व अद्भूत दुर्मिळ ग्रह योगांचा तब्बल ११ राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
मेष: अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळू शकते. परदेशातून चांगला आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ: नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला राहील. महागड्या वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. समाजात आदर वाढेल आणि लोक प्रशंसा करतील. गुंतवणूकीसाठी हा काळ अनुकूल असेल, विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना आखत असाल. उत्साही वाटेल.
मिथुन: देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. कामात नशिबाची साथ मिळू शकेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. भागीदारी व्यवसायात नफा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे. धार्मिक आणि शुभ कार्यांसाठी संधी मिळतील. तसेच या काळात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते.
कर्क: अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमविण्यात यशस्वी होऊ शकाल. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात वाढ होऊ शकते. योजना उपयुक्त ठरतील.
सिंह: सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. व्यवसाय करणारे लोक यावेळी चांगला नफा कमवू शकतात. एखाद्या खास व्यक्तीशी तुमची जवळीक वाढू शकते. विवाहित लोकांचे नाते अधिक घट्ट होईल.
कन्या: कामाचे कौतुक होईल. आदर मिळू शकेल. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना फलदायी ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. भौतिक सुखसोयींची इच्छा वाढेल. पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील.
तूळ: मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर चांगल्या संधी मिळतील. राजकारणात राजकारण्यांशी संबंध वाढतील. या काळात परदेश प्रवास आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता देखील आहे. इच्छा पूर्ण होतील.
वृश्चिक: बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचे कौतुक होईल. अशा परिस्थितीत पदोन्नतीसोबत पगारात वाढ होऊ शकते. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल. व्यवसायात नफा मिळेल. यासोबतच, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण संधी मिळू शकेल.
धनु: जोडीदाराची प्रगती होऊ शकते. अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना बनवू शकता, त्यातून नफा मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करू शकता. नोकरदारांसाठी हा काळ चांगला आहे. इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.
मकर: शत्रूंचा पराभव होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. मीडिया, मार्केटिंग, लेखन किंवा सोशल मीडियाशी संबंधित असाल तर या काळात खूप फायदे मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
कुंभ: वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळू शकेल. परंतु अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवले तर बरे होईल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.