२०२४ची सांगता, ३ योग: ५ राशींना सुखाचा शुभारंभ, विविध लाभ; हनुमान-बाप्पाची कृपा, शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:07 IST2024-12-31T07:07:07+5:302024-12-31T07:07:07+5:30
२०२४ची सांगता कोणत्या राशींना समृद्ध करणारी, येणी वसूल होणारी आणि सकारात्मक अनुकूलता देणारी ठरू शकेल? जाणून घ्या...

३१ डिसेंबर हा सन २०२४चा शेवटचा दिवस आहे. या दिवशी २०२४ या वर्षाची सांगता होत आहे. हे २०२४ वर्ष कसे गेले, याचा आढावा अनेकांनी घेतला असेल. झालेल्या चुका शोधून नवीन वर्षाचे संकल्प केले असतील. २०२४ची सांगता मंगळवारी होत आहे. हा दिवस भगवान हनुमान यांना समर्पित मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाचा प्रभाव या दिवसावर असल्याचे मानले जाते. तसेच गणपती बाप्पाचे विशेष पूजन, नामस्मरण, मंत्र जप, स्तोत्र पठण केले जाते.
मंगळवारी दिवशी भगवान हनुमान यांचे नामस्मरण, स्तोत्र पठण, मंत्रांचे जप करणे लाभदायक मानले गेले आहे. या दिवशी ध्रुव योग, त्रिपुष्कर योग आणि पूर्वाषाढा नक्षत्राचा शुभ योग जुळून येत आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी चंद्र धनु राशीत विराजमान असेल. धनु राशीचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे.
अलीकडेच शुक्राचे गोचर झाले आहे. त्यामुळे एकूणच ग्रहस्थिती पाहता २०२४ वर्षाच्या सांगतेला कोणत्या ५ राशींना सर्वोत्तम संधी, नववर्ष २०२५च्या सुखाचा शुभारंभ आणि विविध आघाड्यांवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकेल? जाणून घेऊया...
मेष: धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. सकारात्मक परिणाम मिळू शकतील. धार्मिक कार्यात आवड वाढेल. व्यवसायात वाढ होऊ शकेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. गुंतवणुकीतून नफा कमावण्याची संधी मिळू शकेल.
मिथुन: २०२४ ची सांगता फायदेशीर ठरू शकते. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभू शकेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल.
कन्या: २०२४ची सांगता कल्याणकारी होऊ शकेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कालावधी चांगला ठरू शकेल. जमीन आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा हनुमंताच्या कृपेने पूर्ण होऊ शकेल. सर्व कामे सहज पूर्ण होतील. व्यावसायिक नवीन वर्षासाठी योजना आखू शकतील.कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील.
मकर: नशीब उजळू शकते. बँक बॅलन्स वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. नोकरदार लोकांसाठी काळ शुभ आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
कुंभ: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. शेअर बाजारातून लाभ मिळू शकतो. व्यवसायात काही फायदेशीर सौदे करता येऊ शकतील. व्यवसाय नवीन उंची गाठेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.