धूलिवंदनाला चंद्रग्रहण: ८ राशींचे ग्रहण संपेल, मालामाल व्हाल; नशिबाची साथ, ग्रहयोग शुभ करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:59 IST2025-03-13T14:46:01+5:302025-03-13T14:59:01+5:30

धूलिवंदन, चंद्रग्रहण काळात दिवशी कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या...

सन २०२५ मधील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होत आहे. १४ मार्च २०२५ रोजी होळी सणातील धूलिवंदनाला हे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण कन्या राशीत असेल. या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान असणार आहे. तर, १४ मार्च रोजीच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. धूलिवंदन, चंद्रग्रहणाला अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत.

मीन राशीत बुध, शुक्र, राहु, नेपच्युन ग्रह विराजमान आहेत. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. मीन राशीत आताच्या घडीला मालव्य राजयोग, लक्ष्मी नारायण योग जुळून आले आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मीन राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग जुळून येतील.

राहु-केतु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच गुरु-चंद्र यांचा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. केतु कन्या राशीत आहे. एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्यामुळे सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योग जुळून आला आहे. तसेच चंद्रही कन्या राशीत असल्यामुळे सूर्य-चंद्राचाही समसप्तक योग जुळून आला आहे. या सर्व ग्रहस्थितीचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...

मेष: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीत वाढ होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतील. भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

वृषभ: यशासोबतच आर्थिक लाभही होऊ शकतो. शनि कृपेने अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आत्मविश्वास वेगाने वाढेल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. मोठ्या भावंडांकडूनही चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: नोकरीत अनेक नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले समन्वय राहील. पगार वाढीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात. सुख, समृद्धी आणि श्रीमंतीचा अनुभव घेऊ शकाल. उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. चांगली बातमी मिळू शकेल. समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. राजकारणाशी संबंधित लोकांना पक्षात नवीन जबाबदारी मिळाल्यास समाजात प्रतिष्ठा आणखी वाढेल.

तूळ: मित्रांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न चांगले राहील. मोठ्या भावाकडून करिअर वाढीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात खूप प्रगती होऊ शकते. भरपूर नफा मिळू शकतो. पैसे वाढवण्यासोबतच बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.

वृश्चिक: व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता. मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. कामात यश मिळेल. इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

धनु: भाग्याची साथ मिळेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. नवीन घर आणि वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे खूप आनंदी व्हाल. समाजातील आदर वाढू शकेल.

मकर: धाकट्या भावंडांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते यावेळी करू शकता. भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आयुष्यात काही मोठे बदल घडू शकतात जे सकारात्मक ठरतील. आत्मविश्वास वाढू शकेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.

कुंभ: पंच महापुरुष राजयोगात शनि देवाच्या आशीर्वादाने, अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कल अध्यात्माकडे अधिक असेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकाल. शनि देव जुनी इच्छा पूर्ण करू शकतात.

दरम्यान, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.