२०२५ची पहिली संकष्ट चतुर्थी: ११ राशींवर बाप्पा प्रसन्न, पद-पैसा वाढ; पुण्य लाभाचा शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:07 IST2025-01-16T07:07:07+5:302025-01-16T07:07:07+5:30

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ची पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत असून, कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची अपार कृपा राहू शकेल? घवघवीत यश, भरभराट, समृद्धी-वैभव-ऐश्वर्याचा लाभ घेता येऊ शकेल? जाणून घ्या...

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ सुरू झाले आहे. अनेकार्थांनी हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे. हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून करतात. आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात.

शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. सकाळी गणपतीची मनोभावे सेवा करून सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर अर्घ्य देऊन व्रताची सांगता करावी, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आहे. २०२५ च्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला असलेल्या ग्रहमानाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मेष: योग्यतेची दखल घेतली जाईल. चांगल्या संधी मिळतील. उत्साह वाढेल. नोकरीत पगारवाढ व तत्सम लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकेल. सामाजिक कार्यात वादविवाद टाळा. वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल.

वृषभ: हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. कदाचित बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. लोकांची ये-जा चालू राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल.

मिथुन: मनात कल्पक विचार राहतील. ते सत्यात उतरण्यासाठी योजना आखाल. कामे होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. नवीन ओळखीचे फायदे होतील. अनेक अडचणी दूर होतील. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल, जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.

कर्क: काही अडचणी असतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात शंका येतील. वादविवादात पडू नका. हळूहळू परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. प्रभाव सर्वांना जाणवेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. जीवनसाथीची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नका.

सिंह: शुभ फळे देणारा कालखंड आहे. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक उत्तम लाभ होतील. आवडत्या लोकांच्या सहवासात मन रमेल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा घडून येईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मोहाच्या जाळ्यात अडकू नका. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील. प्रेमात प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरेल.

कन्या: शुभ संकेत मिळतील. नोकरीत अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संधी मिळेल. त्या संधीचे सोने करून दाखवाल. काहींना मोठी जबाबदारी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा.

तूळ: भाग्याची चांगली साथ मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मनात उत्साह संचारेल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. ती यशस्वीपणे पार पाडाल. नावलौकिक वाढेल. पर्यटनाच्या माध्यमातून काहींचे फिरणे होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. चांगल्या संधी मिळतील. मात्र, बोलताना काळजी घ्यावी.

वृश्चिक: थोरामोठ्यांच्या सहवासात याल. त्यांच्या ओळखीने महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. फार घाईघाईत कामे करू नका. नशिबाची साथ बाजूने राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पगारवाढ व विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन घराचे स्वप्न साकार होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल.

धनु: अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनेक अडचणी दूर होतील. फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. सामाजिक मानमान्यता मिळेल. जीवनसाथीची साथ राहील.

मकर: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही कामे अनपेक्षितपणे झटपट होऊन जातील, तर काही कामे रखडली जातील. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. सबुरीने वागण्याची गरज आहे. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील.

कुंभ: मोठ्या योजना आखल्या जातील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. काही लोक अनपेक्षितपणे विरोधात कारवाया करतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. भेटवस्तू मिळेल.

मीन: शुभ संकेत मिळतील. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. वरिष्ठांकडून योग्य ती दखल घेतली जाईल. एखादी नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. परीक्षेत घवघवीत यश मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.