३ ग्रहांचे ३ राजयोग: १० राशींना फायदा, संचित संपत्तीत वाढ; नवीन नोकरीची संधी, पद-पैसा-लाभ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:09 PM 2024-09-13T14:09:08+5:30 2024-09-13T14:24:28+5:30
तीन ग्रहांच्या तीन राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या... सप्टेंबर महिना सुरू आहे. गणेशोत्सवाची धूम आहे. अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यानंतर पितृपक्ष सुरू होणार आहे. यातच ज्योतिषशास्त्रानुसार, तीन ग्रहांचे अत्यंत शुभ मानले गेलेले तीन राजयोग जुळून येत आहेत. शुक्र आणि बुध यांचे राशी गोचर होणार असून, या दोन्ही ग्रहांच्या राशीपरिवर्तानाने राजयोग जुळून येत आहेत.
विद्यमान स्थितीत शनी स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे. तर १८ सप्टेंबर रोजी शुक्र स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या स्वरास तूळ राशीतील प्रवेशामुळे मालव्य नामक राजयोग जुळून येत आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करत असून, यामुळे भद्र नामक राजयोग जुळून येत आहे.
शनीचा शश राजयोग तसेच आगामी काही दिवसात जुळून येणाऱ्या मालव्य तसेच भद्र राजयोग या तीनही राजयोगांचा सकारात्मक अनुकूल प्रभाव काही राशींवर पडणार आहे, असे सांगितले जात आहे. १० राशी अशा आहेत, ज्यांना उत्तम लाभ, फायदा, नफा, पद, पैसा, प्रतिष्ठा वाढ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
मेष: विविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. या काळात संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी कामगिरीही सुधारेल. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो.
वृषभ: यश प्राप्त होऊ शकेल. नोकरीसंदर्भात कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. स्थावर मालमत्तेतून काही फायदा होऊ शकेल. ऑफिसमधील सहकारी मदत करतील. जागरूकता वाढवा. सर्व उद्दिष्टे पूर्ण करा. बरीच रचनात्मक कामे पूर्ण करू शकाल. कोणतेही काम खूप विचारपूर्वक करा.
मिथुन: तीन ग्रहांचे तीन राजयोग अनुकूल ठरू शकतात. या काळात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमविवाह करायचा असेल तर काळ अनुकूल राहू शकेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल.
कर्क: तीन राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतात. आगामी काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. भौतिक सुख अनुभवू शकाल. विद्यार्थी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी हा काळ अधिक शुभ राहू शकेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
सिंह: आराम मिळू शकेल. थोड्या कष्टाने मोठे यश मिळेल. अनेक योजना पूर्ण होऊ शकतील. आर्थिक सुरक्षिततेचा अनुभव घ्याल. यशामुळे कौतुक होऊ शकेल. कठीण वेळ लवकरच निघून जाईल. जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील. स्वतःवर संयम ठेवल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतील.
कन्या: ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. घरातील सुख-सुविधांचा आनंद घ्याल. आर्थिक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असाल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मैत्रीच्या सीमांकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन केले तर नातेसंबंधावर चांगले नियंत्रण ठेवू शकाल.
तूळ: व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.
धनु: उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जे लोक खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना या कामात यश मिळू शकते. तसेच गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. व्यावसायिक असाल तर मोठा व्यवसायिक करार होऊ शकतो.
मकर: संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सुधारेल. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. व्यवसाय विस्तार होऊ शकतो. फिल्म लाईन, मीडिया, फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगशी संबंधित आहेत त्यांना चांगला फायदा मिळू शकतो.
कुंभ: कमाईच्या दृष्टीने आगामी काळ उत्तम ठरू शकेल. व्यवसायासाठी कुठूनतरी मोठी रक्कम मिळू शकते. परस्पर कौशल्ये सुधारा. इतर लोकांच्या कामात हस्तक्षेप टाळा. कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे. प्रगतीला गती मिळण्याची शक्यता आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.