३ ग्रहांचे गोचर, ३ राजयोग: ११ राशींना मार्च करेल मालामाल, सुख काळ; अचानक धनलाभ, चांगले होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:57 IST2025-02-27T09:42:44+5:302025-02-27T09:57:08+5:30
मार्च महिना अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणार असून, या महिन्यातील ग्रह गोचरामुळे नेमक्या कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतील, ते जाणून घ्या...

फेब्रुवारी महिन्याची सांगता होत असून, आता मार्च महिना सुरू होत आहे. मार्च महिना अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग जुळून येणार आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह शनि स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीत गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव देश-दुनियेवर पाहायला मिळू शकेल.
तर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह आहेत. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग आणि ग्रहण योग जुळून येत आहे. तसेच मार्च महिन्याची सांगता होताना मीन राशीत ६ ग्रहांचा अद्भूत, दुर्लभ योग जुळून येत आहे.
चंद्र ग्रह आणि गुरु ग्रहाच्या युतीने गजकेसरी योगही जुळून येणार आहे. याशिवाय, बुधाचा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील चरणात प्रवेश होणार आहे. तसेच हर्षल ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ही एकूणच परिस्थिती अनेक राशींना अनुकूल, सकारात्मक असणार आहे, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
मेष: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केल्याने उत्पन्न वाढू शकते. या काळात कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कामात यश मिळेल. काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.
वृषभ: सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. करिअरच्या क्षेत्रात खूप फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वेळ चांगला जाईल. व्यवसाय क्षेत्रातही भरपूर नफा मिळू शकतो. बनवलेल्या रणनीती प्रभावी ठरू शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. भाग्यवान ठरू शकता.
मिथुन: अनुकूलता लाभेल. कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल. नाती अधिक घट्ट होतील.
कर्क: अनेक लाभ होऊ शकतील. भाग्याची साथ मिळू शकते. नोकरीत पदोन्नती शक्य. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे आर्थिक संकट दूर होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
सिंह: वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पैशाशी संबंधित अनेक चुकीचे निर्णय घेऊ शकता. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरेल. पण काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. प्रत्येक पावलावर कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.
कन्या: चांगल्या संधी मिळू शकतात. अपेक्षित नफा मिळेल. जे व्यवसाय करतात, हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. बहुतेक वेळ सामाजिक-धार्मिक कार्यात जाईल. कुटुंबाकडून शुभ कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात परस्पर प्रेम आणि सुसंवाद वाढेल. बऱ्याच काळापासून जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते.
तूळ: बऱ्याच काळापासून करत असलेले काम यशस्वी होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यवसायात यश मिळू शकते.
वृश्चिक: गजकेसरी राजयोग भाग्यकारक ठरू शकतो. केलेल्या प्रयत्नांमुळेच यश मिळवू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळू शकेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा होईल. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध राहतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.
धनु: भौतिक सुखे मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील. रखडलेले काम गती घेईल. आर्थिक ताण कमी होईल. नाती अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले निकाल मिळतील. यश मिळेल. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
कुंभ: विलासी जीवनाचा लाभ घेऊ शकाल. सुखसोयींमध्ये वेगाने वाढ होऊ शकेल. संपूर्ण लक्ष करिअरवर असेल, जे फायदेशीर ठरू शकते. कामाची प्रशंसा होण्यासोबत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. घर नूतनीकरण करू शकता, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल.
मीन: प्रसिद्धीसोबतच खूप आदर मिळू शकतो. जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकेल. बऱ्याच काळापासून ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्यात यश मिळू शकते. करिअर क्षेत्रात अनेक फायदे मिळत राहतील. व्यवसायात आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. खूप यशस्वी होऊ शकाल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.