‘या’ ५ राशींना गणपती बाप्पा पावणार! ३ ग्रहांचे भक्कम पाठबळ; महिनाभर शुभ-लाभ, पैसाच पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 09:54 AM2022-08-25T09:54:51+5:302022-08-25T09:59:43+5:30

३ ग्रहांच्या स्थानबदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत विशेष फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने ऑगस्ट महिना अनेकविध ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे महत्त्वाचा ठरला. याच प्रमाणे आता सप्टेंबर महिन्यातही नवग्रहांपैकी ३ ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार असून, गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. इतकेच नाही, तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नवरात्रौत्सव सुरू होत आहे. (September 2022 Astrology)

ज्योतिषशास्त्राप्रमाणे धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही सप्टेंबर महिना अतिशय महत्त्वाचा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात गणेशोत्सव साजरा केला जाईल. त्यानंतर पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाईल आणि उत्तरार्धात नवरात्रोत्सव सुरू होईल. त्यामुळे आगामी दिवस धामधुमीचे असणार आहेत. (surya budha shukra gochar september 2022)

सप्टेंबर महिन्यात ३ ग्रह राशी बदलणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य आपले स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल आणि नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध १० सप्टेंबरला स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत वक्री होणार आहे. २४ सप्टेंबरला शुक्र कन्या राशीत विराजमान होईल. पण, याआधी १५ सप्टेंबरला शुक्र सिंह राशीत अस्तंगत होईल. (sun mercury venus position in september 2022)

या ३ ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होणार आहे. या राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चांगले बदल घडू शकतात. कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा लाभ होऊ शकेल, जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना शुभ ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने त्यांना फायदा होणार आहे. ऑफिसमधील वरिष्ठांकडून तुम्हाला खूप सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारेही पुढे जातील आणि उद्योग क्षेत्रातील लोकांमध्ये तुमचा दर्जा वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनाही या महिन्यात चांगले निकाल मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी घ्या.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना यशकारक ठरू शकेल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळू शकेल. तुमचे व्यावसायिक जीवनही उजळेल. तुम्हाला तुमच्या प्रमोशनशी संबंधित बातम्याही मिळू शकतात. तुमच्यावरील ताणही कमी होईल. व्यवसायाशी निगडित लोकांनाही नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. पण, त्याचबरोबर कौटुंबिक बाबतीतही तुम्हाला काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. वाद वाढवण्याऐवजी ते टाळण्यातच शहाणपणा आहे. आरोग्यासाठी अनुकूल कालावधी असू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना सौभाग्याचा ठरू शकेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात फायदा होईल. कौटुंबिक जीवन चांगले होईल. प्रत्येक बाबतीत तुम्हाला घरच्यांचे सहकार्य मिळेल. आगामी काळात अडकलेले पैसे मिळू शकतात आणि तुम्हाला लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत यावेळी थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना लाभदायक ठरू शकतो. संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीत महिना खूप खास असणार आहे. भाग्य तुमची साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल. व्यावसायिक लोकांनाही चांगल्या संधी मिळतील. हा काळ तुमच्या कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही खूप दिवसांपासून उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. जोडीदारासोबत एकत्र कुठेतरी फिरायला शकता. तुमचे मन अध्यात्माकडेही असेल.

मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना भाग्यकारक ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने लाभाचा काळ आहे आणि तुम्ही जिथे काम कराल तिथे तुम्हाला चांगले स्थान मिळेल. तुम्हाला इतर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीतही हा काळ खूप चांगला जाईल. तुमच्या कुटुंबात परस्पर संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवन आणि प्रेमाच्या दृष्टीने हा काळ खूप खास असेल.