३ ग्रहांचे गोचर: ६ राशींना सप्टेंबर सुखद, इच्छापूर्तीचा काळ; नवीन नोकरीची संधी; अनेकविध लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:54 PM2024-08-27T12:54:17+5:302024-08-27T13:01:53+5:30

सप्टेंबर महिन्यात कोणत्या ग्रहांचे कधी अन् कसे गोचर असेल? कोणत्या राशींवर प्रभाव पडेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिना वैविध्यपूर्ण, अनेक शुभ योग, ग्रहांचे संयोग यांनी विशेष ठरला. ऑगस्ट महिन्यात श्रावण मासातील विविध व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे करण्यात आले. आता काही दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होत आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवासह अनेकविध कार्याचरण केले जातील. सप्टेंबर महिन्यात तीन ग्रहांचे गोचर होणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रह कर्क राशीतून पुन्हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ऑगस्ट महिन्यात वक्री चलनाने बुध कर्क राशीत विराजमान झाला होता. त्यानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करत आहे. तर शुक्र ग्रह १८ सप्टेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करत आहे. यानंतर पुन्हा एकदा बुधाचे गोचर होणार आहे. बुध ग्रह २३ सप्टेंबर रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

सप्टेंबर महिन्यात बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. बुधाचे दोनदा होणारे गोचर विशेष मानले जात आहे. यासह अनेकविध शुभ योग, राजयोग जुळून येणार आहेत. या शुभ योगांचा कोणत्या राशींना चांगला लाभ, फायदा, नफा होऊ शकेल, कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: अनेक प्रकारे आनंददायी ठरू शकेल. नशिबाची योग्य साथ मिळू शकेल. आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल. जे काम प्रलंबित होते ते पूर्ण होऊ शकेल. धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. नोकरदारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल आणि आदर मिळेल.

सिंह: सर्वाधिक सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकेल. भाग्य वृद्धी होऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील, आर्थिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत मजबूत होईल. व्यवसायात लाभ आणि विस्तार होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुखद क्षण येतील.

कन्या: आगामी काळ चांगला सिद्ध होऊ शकेल. संपत्ती वाढेल. चांगल्या संधींमध्ये वाढ होऊ शकते. नोकरी बदलायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. भौतिक सुखसोयी वाढतील. काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगला सन्मान मिळू शकेल.

तूळ: सर्वाधिक फायदा मिळू शकतो. आगामी काळ खूप शुभ राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. मोठे यश मिळू शकते. योजना सफल होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. या संपूर्ण महिन्यात कुटुंबात सुख, शांतता आणि प्रगतीची शक्यता राहील.

धनु: जवळजवळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती, लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. अपेक्षित यश मिळेल. अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अनपेक्षित ठिकाणाहून आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करताना दिसतील.

मीन: शुभ आणि सौभाग्यामध्ये वाढ होऊ शकेल. नियोजित कामे पूर्ण होतील. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगार असाल, तर अपेक्षित रोजगार मिळू शकतो. नोकरदार लोकांच्या प्रोफेशनल लाइफमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. व्यवसायाशी संबंधित लोकांवर विशेष प्रकारचा प्रभाव दिसून येईल. एकाच वेळी अनेक व्यवसायांमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेऊ शकता. प्रेम जीवन छान असू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.