गुरुवारी गुरुकृपा: ३ राजयोगांचा ६ राशींना दुप्पट लाभ, जे ठरवाल ते घडेल; स्वामी शुभच करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:19 IST2025-03-05T14:09:40+5:302025-03-05T14:19:38+5:30
गुरुवारी केलेली स्वामी सेवा विशेष मानली जाते. ३ राजयोग जुळून येत असून, काही राशींना हा वरदान काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक चांगले योग, शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. शीघ्र गतीने गोचर करणारा चंद्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ राशीत असलेल्या गुरु ग्रहाशी युती होऊन अतिशय शुभ मानला गेलेला गजकेसरी राजयोग जुळून येत आहे.
तसेच वृषभ रास ही चंद्राची उच्च रास मानली गेली आहे. त्यामुळे चंद्राचे वृषभ राशीतील भ्रमण उत्तम मानले गेले आहे. यामुळे गौरी योग जुळून येत असून, हा राजयोगाप्रमाणे फले देणारा योग मानला गेला आहे. मीन राशीत बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आलेला आहे.
गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित वार मानला जातो. या दिवशी दत्तावतारी असलेले स्वामी महाराजांचेही विशेष पूजन केले जाते. गुरु ग्रहाची कृपा असावी, यासाठीही पूजन-दानासह काही गोष्टी आवर्जून केल्या जातात. एकूणच जुळून येत असलेले राजयोग काही राशींना सर्वोत्तम लाभाचे ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
मेष: काही अडचणी असतील. मनात शंका असतील. कालांतराने परिस्थिती आटोक्यात येईल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. गुरुवारी धन स्थानातून होणाऱ्या चंद्र-गुरू भ्रमणामुळे अनुकूल फळे मिळतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील.
वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. कायद्याची बंधने पाळा. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. अनेक अडचणी दूर होतील.
मिथुन: जे-जे ठरवाल ते-ते सिद्धीस जाईल. लोकांचे समर्थन चांगले राहील. काही किरकोळ अडचणी आल्या तरी लवकरच परिस्थितीवर नियंत्रण येईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. धार्मिक कार्यासाठी प्रवास होतील. मिळालेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. शुक्रवार, शनिवार चांगली बातमी कळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील.
कर्क: नशिबाचा कौल बाजूने राहील. योजनांच्या बाबतीत लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. समाजात मान वाढेल. नोकरीत अनुकूल बदल होतील. घरी पाहुणे मंडळी येतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. लाभस्थानातील होणाऱ्या चंद्र-गुरू युतीची शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल.
सिंह: फार दगदग होईल, अशी कामे करू नका. वाहने जपून चालवा. थोडा आराम करून मगच कामाला लागावे. इतरांच्या भानगडीत पडू नका. 'घरचं झालं थोडं अन् त्यात व्याह्याने धाडलं घोडं' अशी परिस्थिती राहील. गुरुवारपासून चांगला काळ आहे. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. शुक्रवार, शनिवारी लाभस्थानातील चंद्र-मंगळ युतीची शुभ फळे मिळतील.
कन्या: व्यवसायात सतत व्यस्त राहाल. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. सुरुवातीला दगदग होईल. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. थोडे सावध राहा. हुरळून जाऊन घाईघाईत कामे करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गुरुवारी भाग्य स्थानातून होणाऱ्या चंद्र-गुरू युतीची शुभ फळे मिळतील. समाजात मान वाढेल.
तूळ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल अशी कामे करू नका. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. गुरुवारी अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र-गुरू युतीमुळे थोडे सावध राहा. शुक्रवार, शनिवार चांगली बातमी कळेल.
वृश्चिक: साधकबाधक अनुभव येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी कळेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. गुरू-चंद्र युतीची अनुकूल फळे मिळतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
धनु: एकंदरीत लाभदायक परिस्थिती राहील. नोकरीत नवीन संधी मिळेल. कामाचे स्वरूप बदलल्यामुळे सुरुवातीला थोडी दगदग होईल. योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे कामे आटोक्यात येतील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. मनात आनंदी विचार राहतील. अडचणी दूर झाल्यामुळे हलके वाटेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
मकर: शुभ ग्रहांच्या भ्रमणाची शुभ फळे मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. घरी अनाहूत पाहुणे मंडळी येतील. गुरू-चंद्र युतीमुळे चांगले अनुभव येतील. एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल. मुलांना यश मिळेल.
कुंभ: अनुकूल फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. काहींना प्रवास घडून येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. शुक्रवार, शनिवारी चंद्र-मंगळ युतीची प्रभावी फळे मिळतील.
मीन: अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. अडचणी दूर होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. उलाढालीत फायदा होईल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना सतर्क राहा. भावंडांशी मधुर संबंध राहतील. नोकरीत महत्त्व वाढेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.