४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:14 PM2024-11-21T15:14:57+5:302024-11-21T15:25:13+5:30

२०२४ या वर्षाची सांगता होताना अनेक राशींना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडीवर सकारात्मक लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

सन २०२४ चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर अगदी काही दिवसांनी सुरू होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा महिना खास ठरू शकणारा आहे. डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळ, शुक्र, बुध ग्रह गोचर करणार आहेत. यासोबत खरमास सुरू होणार आहे.

०२ डिसेंबर रोजी शुक्र गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. ०७ डिसेंबरला मंगळ कर्क राशीत वक्री होणार आहे. १५ डिसेंबरला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करेल. तर बुध वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे.

डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. ०२ डिसेंबरला मकर राशीत विराजमान झालेला शुक्र २८ डिसेंबर रोजी शनीचेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वर्ष संपण्यापूर्वी शुक्र आणि शनीचा युती योग जुळून येणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना अनेक राशींना भाग्यकारक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: डिसेंबर महिना खूप शुभ राहील. महिन्याच्या सुरुवातीला कामात चांगले परिणाम मिळतील. आदर वाढेल. या महिन्यात आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या समस्या दूर होतील. मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर त्याचा फायदा होईल.

वृषभ: डिसेंबर महिन्यात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतील. प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. वर्ष संपण्यापूर्वी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. जोडीदारासोबत अधिक वाद होऊ शकतात. जोडीदाराला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही.

सिंह: डिसेंबरचा महिना प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांसाठी, विशेषतः परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. घरात सुख-शांती नांदेल. प्रेम जीवनातही आनंद राहील. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील.

कन्या: डिसेंबर महिना यशाचा महिना असेल. घरात आणि बाहेर आदर वाढेल. कोणतेही काम कराल, त्याचे कौतुक होईल. या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. व्यवसायात लाभ होईल.

तूळ: डिसेंबर महिना भाग्यकारक ठरू शकतो. नोकरदारांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने मोठी कामे करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, जी तुम्हाला भविष्यात मदत करेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.

मकर: २०२४ वर्षाचा शेवटचा महिना शुभ ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरेल. करिअरमध्ये प्रगती दिसेल. कामाच्या संदर्भात केलेले प्रवास फलदायी ठरू शकतील. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यात प्रगती होऊ शकेल. काम पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचा विचार करू शकता.

मीन: डिसेंबर महिना खूप खास ठरू शकतो. स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळेल. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही हा महिना चांगला राहील. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. इच्छा पूर्ण होतील. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.भागीदारीत काम करतात त्यांचे चांगले संबंध राहतील. सन २०२४ संपण्यापूर्वी जाता जाता चांगले गुडलक देऊन जाऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.