लक्ष्मी नारायण बुधादित्य मंगल योग: ५ राशींना सौभाग्याचा काळ, धनलाभ योग; २०२३ चा शेवट शुभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:31 PM2023-12-25T12:31:38+5:302023-12-25T12:43:10+5:30

सन २०२३ ची सांगता होताना ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे नववर्षाची सुरुवात लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सन २०२३ ची सांगता होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्याच्या शेवटी काही ग्रह गोचर होत असून, यामुळे जुळून येणाऱ्या शुभ संयोगाचा देश-दुनियेसह सर्व राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकते. नववर्षाची सुरुवात चांगली होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चार ग्रहांचे गोचर होणार आहे. शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध वक्री चलनाने धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह धनु राशीत विराजमान होणार आहे आणि गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे.

या चार ग्रहांच्या गोचरामुळे लक्ष्मी नारायण, बुधादित्य, आदित्य मंगल योग असे राजयोग जुळून येणार आहेत. तसेच बुधादित्य योगावर गुरुची नवम पंचम दृष्टी राहणार आहे. एकूण ग्रहस्थिती आणि शुभ योगांचा अद्भूत संयोग ५ राशीच्या व्यक्तींना सन २०२३ ची सांगता आणि नववर्षाची सुरुवात दमदार आणि मालमाल करणारा काळ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: सन २०२३ ची सांगता खूप शुभ असणार आहे. मित्र खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्राच्या मदतीने कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जे राजकारणाशी निगडीत आहेत त्यांना काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. खूप दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा पूर्ण होईल. काही नवीन कामाच्या सुरुवातीमुळे मनात उत्साह राहील. आर्थिक दृष्टिकोनातून काळ खूप शुभ आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.

सिंह: सन २०२३ वर्षाचा शेवट शुभ आणि सौभाग्य देणारा ठरू शकेल. अनेक मोठ्या समस्या सुटू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकेल. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मिटतील. प्रिय जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवाल.

तूळ: आगामी काळ नातेवाईकांसोबत आनंदात जाईल. जवळच्या मित्र किंवा कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. नोकरदार लोकांना नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदारांसाठी काळ खूप चांगला जाणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतील. खूप मान-सन्मान मिळेल. नशीब पूर्ण साथ देईल. सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. पूर्वीच्या कोणत्याही योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे होतील. वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.

धनु: वाणी आणि बुद्धीने एखादे मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरदारांना काही मोठे यश किंवा सन्मान मिळू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. उत्पन्नाचे विविध स्रोत मिळू शकतील. गुंतवणूकदारांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित अपेक्षित यश मिळू शकते. प्रिय जोडीदारासोबत घालवण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील.

मीन: आगामी काळ आनंद देणारा ठरू शकेल. तो आनंद मिळू शकेल जो खूप दिवसांपासून मिळवण्याचा प्रयत्न करत होता. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. परदेशी करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर या बाबतीत काही मोठे यश मिळू शकते. घर आणि ऑफिसमध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. ज्याच्या मदतीने भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रेम जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.