१०० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ संयोग: ७ राशींना वरदान काळ; अपार धनलाभ, ५ ग्रहांची विशेष कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 01:51 PM2023-07-26T13:51:52+5:302023-07-26T14:03:26+5:30

4 Rajyoga After 100 Years In Adhik Maas 2023: अधिक मासात राजयोगांचा शुभ संयोग जुळून येत आहे. ७ लकी राशी कोणत्या? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात नवग्रह नियमितपणे राशीगोचर करत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत ग्रहाचे गोचर होते, तेव्हा त्याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पडतो, असे सांगितले जाते. अधिक मास सुरू आहे. श्रावण अधिक महिन्यात सुमारे १०० वर्षांनी ४ राजयोगांचा अद्भूत, दुर्मिळ असा शुभ संयोग जुळून आल्याचे म्हटले जात आहे.

अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्याने याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. अधिक महिन्यात लक्ष्मी नारायण नामक अत्यंत शुभ राजयोग जुळून आला आहे. बुध आणि शुक्राच्या युतीने हा योग जुळून आला आहे. याशिवाय बुधादित्य राजयोग आहे.

याशिवाय सिंह राशीत त्रिग्रही योगही जुळून आला आहे. या राशीत मंगळ, शुक्र आणि बुध विराजमान आहेत. याशिवाय हे तीनही ग्रह कुंभ राशीत असलेल्या शनीपासून सातव्या स्थानी असल्याने शनी आणि मंगळ-बुध-शुक्राचा चतुर्ग्रही समसप्तक योग जुळून आला आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेवाचा शश महापुरुष राजयोग जुळून आलेला आहे. तसेच केंद्र त्रिकोण राजयोग आहे. अधिक मासात पाच ग्रहांचे जुळून आलेले राजयोग अतिशय शुभ-लाभदायी मानले गेले आहेत.

या ४ राजयोगांचा शुभ प्रभाव ७ राशींवर पडू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, करिअर, कुटुंब, नोकरी-व्यवसाय यांमध्ये यश-प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. सुखा-समाधानाचा समृद्धीचा काळ अनुभवला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ७ लकी राशी कोणत्या? तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होऊ शकते. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. अचानक पैसे मिळू शकतात. शेअर बाजार, लॉटरीतून नफा मिळू शकतो.

वृषभ राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल सिद्ध होऊ शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. प्रयत्न करत राहा. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खूश असतील, परिणामी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नशिबाची उत्तम साथ लाभू शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ अनुकूल ठरू शकतो. कामात नशिबाची साथ मिळेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल. भावंडे आणि मंत्रिमंडळींच्या सहवासाने आनंदात वेळ जाऊ शकेल. मात्र, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजूने सकारात्मक प्रगती शक्य आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ संभवतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकतो. भाग्याची भक्कम साथ लाभू शकते. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास, हिम्मत वाढेल. बोलण्यातही सकारात्मकता दिसून येईल. इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकाल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.

धनु राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ सकारात्मक ठरू शकेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ अनुकूल राहील. भागीदारीच्या कामात सकारात्मक प्रगती संभवते. जीवनसाथीसोबत सामान्य तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. व्यक्तिमत्व सुधारेल. कामकाजाच्या क्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. जास्त मेहनत करावी लागेल.

मकर राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ लाभदायक ठरू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येईल. नोकरी बदलायची असेल तर यश मिळेल. त्याचा प्रभाव तुमच्या बोलण्यात दिसेल, ज्यामुळे लोक जोडले जातील. सुखांमध्ये वाढ होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना ४ राजयोगांचा काळ अनुकूल सिद्ध होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांचा फायदा होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.