१०० वर्षांनी ४ महाराजयोग: ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार, अच्छे दिन येणार; सुख-समृद्धी लाभणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:19 AM2023-03-23T07:19:08+5:302023-03-23T07:19:08+5:30

दुर्मिळ राजयोगांमुळे काही राशीच्या व्यक्तींची मार्चची सांगता आणि एप्रिलची सुरुवात शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

मार्च महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेला आहे. मराठी नववर्षाची सुरुवात झाली आहे. यानंतर आता या महिन्यात अनेक शुभ सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातील. या महिन्याच्या अखेरीस श्रीराम नवमी आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास आगामी काळात ४ दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. हा काळ महाराजयोगांचा असल्याचे सांगितले जात आहे.

तब्बल १०० वर्षांनी असे राजयोग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. ग्रहांचे नक्षत्र आणि राशी गोचराने असे राजयोग जुळून येत असतात. गजकेसरी, नीचभंग, बुधादित्य व हंस राजयोग असे ४ मोठे राजयोग मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जुळून येत आहेत. या राजयोगांचा सर्व राशींवर प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस जुळून येत असलेल्या ४ महाराजयोगांचा ५ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतील. धनलाभ व पदोन्नती, करिअरमध्ये तुम्हाला एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना ४ महाराजयोग लाभदायक ठरू शकतात. येत्या काळात तुम्हाला बुद्धीच्या जोरावर धनलाभ मिळवता येऊ शकतो. तसेच तुमच्या व्यक्तिमत्वात काही अत्यंत सुंदर बदल घडू शकतात. तुम्ही सहज म्हणून केलेली एखादी कृती तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. तसेच तुमच्या मदतीने एखाद्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी लाभू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना ४ महाराजयोग सकारात्मक ठरू शकतात. येत्या काळात नात्यांमध्ये प्रेम व एकोपा अनुभवता येऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीची संधी लाभू शकते. सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कामाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्हाला इतरांचे सहकार्य करून अधिक धनलाभ मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात.

कन्या राशीच्या व्यक्तींचे ४ महाराजयोगांमुळे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीचा योग जुळून येऊ शकतो. येत्या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या माणसाची महत्त्वाची साथ लाभू शकते. आयुष्यात काही मोठे व महत्त्वाचे बदल होऊ शकतात. कौटुंबिक सुखामुळे मानसिक ताण तणाव दूर होऊ शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना ४ महाराजयोग लाभदायक ठरू शकतात. या काळात सर्व भौतिक सुख अनुभवता येऊ शकेल. आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमची थांबलेली, रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

कुंभ राशीच्या व्यक्तींचे ४ महाराजयोगाने अच्छे दिन सुरु होऊ शकतात. येत्या काळात प्रगतीची संधी आहे. गुंतवणूक करण्यात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून स्तुती ऐकायला मिळू शकते. परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो. एकही संधी सोडू नका.

मराठी नववर्षाच्या दिवशीही अनेक अद्भूत शुभ योग जुळून आले होते. ज्याचा काही राशींना चांगला फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.