२४ सप्टेंबरला ५९ वर्षांनी ५ शुभ राजयोग: ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; पद, पैसा, प्रतिष्ठेचे वरदान! By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:31 PM 2022-09-19T13:31:59+5:30 2022-09-19T13:40:28+5:30
सप्टेंबरमध्ये ५ अद्भूत राजयोग जुळून येत असून, काही राशींना लाभदायक ठरू शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? जाणून घ्या... सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नवरात्रोत्सव याच महिन्यात साजरे केले जात असताना, दुसरीकडे नवग्रहांच्या गोचरामुळे अद्भूत प्रकारचे राजयोग जुळून येताना पाहायला मिळत आहेत. एकाच दिवशी २४ सप्टेंबरला एक, दोन, तीन नाही, तर तब्बल ५ शुभ राजयोग जुळून येत आहेत. (5 amazing rajyoga comes after 59 years on 24 september 2022)
सप्टेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध आणि शुक्र या तीन ग्रहांचे महत्त्वाचे राशीपरिवर्तन आणि चलनबदलामुळे तब्बल ५९ वर्षांनी अद्भूत योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. २४ सप्टेंबर रोजी शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत आल्यानंतर दुर्मिळ राजयोग तयार होत असल्याचे म्हटले जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, नीचभंग राजयोग, बुधादित्य राजयोग, भद्र राजयोग आणि हंस नावाचे राजयोग तयार होत आहेत. नीचभंग राजयोगही दोन प्रकारांमध्ये तयार होत आहे. याशिवाय कन्या राशीत सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे. त्यामुळे या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.
२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी एक दुर्लभ योग तयार होत आहे. आणखी या महिन्याचे विशेष म्हणजे नवग्रहांचा गुरु मानला गेलेला गुरु ग्रह, नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह शनी आणि बुध स्वराशीत वक्री आहेत. परंतु यापैकी पाच राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये भरपूर यश मिळेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
वृषभ राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ रोजयोग फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचा स्वामी शुक्र नीच स्थितीत राहील. त्यामुळे दुर्बल राजयोग असेल. तसेच गुरु लाभस्थानी असल्याने या काळात त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. त्याचवेळी शनीदेव भाग्यस्थानी विराजमान असल्यामुळे ज्या लोकांचा व्यवसाय लोह, पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच नवपंचम आणि समसप्तक योगही जुळून येत असल्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
मिथुन राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ रोजयोग यशकारक ठरू शकतात. हंस नामक राजयोगामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकेल. जीवनसाथीच्या माध्यमातून संपत्ती मिळू शकते. जे लोक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत, अशा लोकांसाठी ही वेळ भाग्यशाली ठरू शकते. या काळात या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते. केंद्रस्थानी तीन शुभ ग्रह आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथही मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
कन्या राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ रोजयोग प्रगतीकारक ठरू शकतात. या राशीचा स्वामी बुध ग्रह उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे व्यवसायात चांगले यश मिळू शकते. दुसरीकडे, भाग्य आणि संपत्तीचा स्वामी शुक्र ग्रह नीच भंग राजयोग तयार करत आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्या व्यक्ती माध्यम, चित्रपट या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.
धनु राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ रोजयोग अनुकूल ठरू शकतात. या कालावधीत हंस, नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात व्यवसायात चांगले पैसे कमवू शकतात. तसेच, यावेळी नवीन करार अंतिम केल्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. यावेळी केलेला व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो.
मीन राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ रोजयोग खूप चांगले ठरू शकतात. शनीदेव लाभदायक स्थानावर विराजमान आहेत. नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात मिळालेल्या नव्या ऑर्डर्सचा फायदा होईल. त्याच वेळी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या कुंडलीनुसार राजयोगांचा कसा लाभ मिळू शकेल, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.