५ ग्रहांचे गोचर: ५ राशी लकी, डिसेंबर जाईल दणक्यात, कमाई वाढेल; ४ राशींनी राहावे सावधान! By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:07 AM 2023-11-24T07:07:07+5:30 2023-11-24T07:07:07+5:30
सन २०२३ चा अखेरचा डिसेंबर महिना काही राशींना लाभदायक, तर काही राशींना काहीसा तापदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. इंग्रजी वर्षाचा शेवटचा महिना काही दिवसांनी सुरू होईल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास अखेरचा डिसेंबरचा महिना महत्त्वाचा ठरणारा आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे पाच ग्रह गोचर करणार आहेत. हे पाचही ग्रह नवग्रहांपैकी महत्त्वाचे मानले जातात आणि याचा देश-दुनियेसह सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो, असे सांगितले जात आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस धनु राशीत प्रवेश केलेला बुध १३ डिसेंबर रोजी वक्री होत आहे. तर १६ डिसेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे. तर २५ डिसेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तर मंगळ ग्रह २७ डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे.
धनु राशीत सूर्य, बुध आणि मंगळ यांचा त्रिग्रही योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल योग असे शुभ ग्रह जुळून येत आहेत. या ग्रहांचे गोचर ५ राशींसाठी भाग्योदय, नशिबाची साथ देणारे ठरू शकेल. तर ४ राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कोणत्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...
वृषभ राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर भाग्यकारक ठरू शकेल. प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. जे काही काम ठरवले असेल किंवा करायचे आहे, ते करायला मिळेल. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. नोकरी-व्यवसायात एखादा प्रयोग करू शकता. त्यात नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना काही स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. व्यवसायात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. उच्च प्रतिष्ठित लोकांशी संवाद वाढेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. काही प्रकरणांमुळे तणाव असू शकतो. व्यवसायात अनेक वादग्रस्त परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. बजेटची विशेष काळजी घ्या. प्रवासाची योजना बनवू शकता.
तूळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर शानदार ठरू शकेल. एकामागून एक प्रगतीच्या अद्भुत संधी मिळतील. प्रलंबित पैसे परत मिळतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जे लोक लग्न करण्याचा विचार करत आहेत, त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळेल.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मन कोणत्याही कामात नीट एकाग्र होऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी शंभर टक्के कामगिरी होऊ शकणार नाही. कामाचा ताण जास्त असेल. आराम मिळणार नाही. जास्त धावपळ करावी लागेल. वाद टाळण्याचा सल्ला दिला जातो. नियोजित योजनांमध्ये अंशतः यश मिळेल.
धनु राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर शुभ प्रभावाचा ठरू शकेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. एखादे वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करू शकता. या दिशेने केलेली गुंतवणूक भविष्यात लाभ देईल. नवीन वर्षात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणार्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. नवीन कामात चांगला नफा मिळेल.
मकर राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर शुभफलदायी ठरू शकेल. जे काम बरेच दिवस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ती आता पूर्ण होणार आहेत. इच्छित जीवनसाथी शोधण्याचा शोध पूर्ण होऊ शकेल. पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान असतील. पैसा कमावण्याची इच्छा पूर्ण होईल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नशीब साथ देईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचराचा विशेष लाभ होऊ शकेल. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदारांची बढती निश्चित होऊ शकते. व्यावसायिक असाल तर महत्त्वाची कामे पुढे जाऊ शकतील. आर्थिक आघाडी आणि करिअरच्या मार्गातील अडथळे दूर शकतील. भाग्यवृद्धी होईल. सर्व योजना पूर्ण होतील. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.
मीन राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमधील ग्रह गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. विरोधाभासी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी आणि व्यवसायात अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यावर उपाय मिळू शकतील. पालकांशी काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. चुकांमुळे अडथळे येऊ शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.