५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील! By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 09:23 AM 2024-10-26T09:23:52+5:30 2024-10-26T09:35:23+5:30
दिवाळीचा काळ काही राशींना सर्वोत्तम वरदानासारखा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियोजित वेळेनुसार राशी आणि नक्षत्र गोचर करत असतो. अशावेळी ग्रहाच्या नक्षत्र गोचर किंवा राशी परिवर्तनाचे शुभ आणि प्रतिकूल प्रभाव सर्व राशींसह देश-दुनियेवर पडत असतात. २८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. यंदा आठवडाभर दिवाळी असणार आहे. या काळात काही ग्रहांच्या गोचराने अद्भूत योग जुळून येत आहेत.
बुध ग्रह विशाखा नक्षत्रात विराजमान झाला आहे. तर, गुरु स्वाती नक्षत्रात आहे. तसेच शुक्र आणि मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी शुक्र ज्येष्ठ नक्षत्रात तर, २८ ऑक्टोबर रोजी मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, २९ ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र विराजमान असून, लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे.
तसेच ३० ऑक्टोबर रोजी नेपच्यून ग्रह पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ग्रहांचे राशी आणि नक्षत्र गोचरामुळे अनेक राशींना दिवाळी अतिशय शुभ, लाभदायक, चांगला फायदा करून देणारी आणि लक्ष्मी देवीची कृपा होणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
मेष: उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ: नव्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल. नोकरदारांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना व्यवसाय वाढवायचा असेल तर या काळात चांगले लाभ मिळू शकतात. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.
कर्क: यशाचा आणि नशिबाची साथ लाभणार काळ ठरू शकेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. एक वेगळाच उत्साह आणि उर्जा संचारेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामावर पूर्णपणे समाधानी आणि आनंदी राहतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवाळी वरदानापेक्षा कमी नाही. इच्छा पूर्ण होऊ शकते.
सिंह: हा काळ भाग्यकारक ठरणार आहे. नोकरी करत असाल तर बढती मिळू शकते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेम जीवनात मोठे बदल होऊ शकतात. कौटुंबिक दृष्टीकोनातूनही हा काळ खूप शुभ राहील. व्यावसायिकांना पैसे गुंतवून मोठा फायदा होऊ शकतो.
तूळ: हा काळ शुभ राहील. कुटुंबात सुख-शांततेचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रुची राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
धनु: प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास शुभ ठरू शकतो. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ: फक्त फायदाच होणार होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. देवी लक्ष्मीची अपार कृपा होऊ शकेल. घरात सुख-शांतता नांदेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. हा काळ सर्वोत्तम म्हणता येईल. सत्ता आणि सरकारशी संबंधित कामांमध्येही अपेक्षित यश आणि लाभ मिळू शकतात. जे परीक्षा स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मीन: आगामी काळ शानदार ठरू शकेल. नियोजित कामे पूर्ण होतील. किरकोळ अडथळे येतील, तरीही चांगले आर्थिक लाभ मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरदारांना अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सरकारी किंवा खाजगी संस्थेत अडकलेला पैसा अनपेक्षितपणे बाहेर येईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर मताशी सहमती मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी लहानसहान गोष्टींमध्ये अडकणे टाळावे लागेल. बोलण्याने गोष्टी घडतील आणि बोलण्याने गोष्टी बिघडतील. प्रेमसंबंधात असाल तर पार्टनर एक मोठे सरप्राईज गिफ्ट देऊ शकतो.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.