५ ग्रहांचे गोचर: ६ राशींना मार्च करेल मालामाल, पद-पैसा वाढेल; उत्तम संधी मिळेल, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:22 PM2024-02-21T15:22:43+5:302024-02-21T15:29:23+5:30

मार्च महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत असून, काही राशींना उत्तम फायदा होऊ शकतो, असे सांगितले जाते.

फेब्रुवारी महिना सुरू आहे. काही दिवसांनी मार्च महिन्याला प्रारंभ होणार आहे. मार्च महिन्यात गजानन महाराज प्रकटदिन, महाशिवरात्री, होळी यांसह अनेक महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. यासह मार्च महिना ज्योतिषदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणारा असल्याचे सांगितले जात आहे.

मार्च महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ०७ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचवेळी बुधाचा मीन राशीत उदय होणार आहे. ०७ मार्च रोजी शुक्र हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीतील शनी आणि सूर्य या ग्रहांशी शुक्राचा युती योग जुळून येणार आहे. तर, १४ मार्च रोजी नवग्रहांचा राजा सूर्य ग्रहाच्या मीन प्रवेशाने मीन संक्रांती प्रारंभ होईल.

सूर्याच्या मीन प्रवेशामुळे बुध आणि सूर्याचा बुधादित्य योग जुळून येईल. १५ मार्च रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील शनी आणि शुक्र यांच्याशी मंगळाचा युती योग जुळून येईल. तर १८ मार्च रोजी शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. या एकूणच ग्रहस्थितीचा ६ राशीच्या व्यक्तींना करिअर, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडी, व्यवसाय या आघाड्यांवर उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: उर्जेने परिपूर्ण असाल. अनेक शुभ तसेच आश्चर्यकारक घटना अनुभवास येऊ शकतील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही शुभ कार्यक्रम घडू शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकेल. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. ज्यामुळे करिअरमध्ये यश-प्रगतीची संधी मिळेल. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थितीही सुधारेल.

कर्क: शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अनेक प्रकारच्या गुंतवणूक संधी मिळू शकतील. लाभही मिळू शकेल. काही अनुभवी लोकांना भेटून कार्यशैली सुधारेल. सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ लोकांचे सहकार्य मिळेल. कामात लाभ मिळू शकतो.

सिंह: नशिबाची साथ मिळू शकेल. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. भागीदारीत काम करत असाल तर चांगला नफा मिळेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. सूर्य कृपेने मानसिक शांतता, आनंद आणि सकारात्मक विचार वाढतील. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. बुध ग्रहाचा शुभ प्रभाव पडू शकेल. भाग्याची साथ लाभू शकेल.

कन्या: अडथळे दूर होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पावलावर कुटुंबाची साथ मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. मुले शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतील. नोकरदारांच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल. धार्मिक कार्यासाठी हा काळ खूप चांगला राहील, उपासनेकडे आकर्षण वाढेल.

वृश्चिक: चहुबाजूंनी सर्वांगीण विकास होऊ शकेल. कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. जमीन किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. अधिकाऱ्यांशी संबंधही मजबूत राहतील. जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वैचारिक मतभेद असतील तर ते सोडवले जाऊ शकतात. परस्पर संबंधांमध्ये प्रेम कायम राहील.

कुंभ: सर्व समस्यांना धैर्याने सामोरे जाल. सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. योजना पूर्ण होतील. नोकरदारांना नवीन काम मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. कुटुंबाला वैभव प्राप्त होईल. दैनंदिन कामात उत्साही राहाल. हिंमत वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.