५ ग्रहांचे गोचर, ५ राशींना बंपर लाभ; नोव्हेंबर महिना ठरेल खास, तुमची रास आहे का यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:24 PM2023-10-28T13:24:03+5:302023-10-28T13:30:30+5:30

नोव्हेंबर महिन्यात महत्त्वाचे ग्रह गोचर करणार असून, ५ लकी राशींना धनसंपत्ती वृद्धी, यश-प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यानंतर आता येणारा आगामी नोव्हेंबर महिनाही विशेष ठरणारा आहे. या महिन्यात नवग्रहांतील पाच महत्त्वाचे ग्रह गोचर करणार असून, त्याचा प्रभाव देश-दुनियेसह सर्व राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा मोठा सण आहे. चातुर्मासाची सांगता होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात शनी, शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ हे ग्रह गोचर करणार आहे. या ग्रहांचा प्रभाव काही राशींना अतिशय सकारात्मक ठरू शकतो, तर काही राशींना काहीसा संमिश्र ठरू शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर ०४ नोव्हेंबर रोजी शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या ६ तारखेला नवग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहही याच दरम्यान वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

याशिवाय २७ नोव्हेंबर रोजी बुध पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शुक्रही २९ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा गोचर करून तूळ राशीत प्रवेश करेल. या ग्रहांच्या एकूण गोचराचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळून सकारात्मक घटना घडू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

कर्क राशीच्या व्यक्तींना ५ ग्रहांचे गोचर उत्तम ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी मिळालेल्या यशाबद्दल समाधानी वाटेल. व्यावसायिक प्रगतीला नशिबाची योग्य साथ लाभू शकेल. विद्यार्थ्यांसाठी आगामी काळ अनुकूल आहे. नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला, शिल्पकला आणि इतर कलांचा अभ्यास करणाऱ्यांना यश मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना ५ ग्रहांचे गोचर आर्थिकदृष्ट्या खूप अनुकूल सिद्ध होईल. परिस्थिती अनुकूल असणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होईल. करिअर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देतील. शुभ परिणाम मिळतील. कौटुंबिक बाबींसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन दोन्ही चांगले जाईल.

धनु राशीच्या व्यक्तींना ५ ग्रहांचे गोचर आर्थिक परिस्थिती अनुकूल करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्येष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळ सकारात्मक ठरू शकेल. मुलांच्या बाजूने खूप समाधानी असाल.

मकर राशीच्या व्यक्तींना ५ ग्रहांचे गोचर पैसा, मालमत्ता आणि आर्थिक बाबींच्या बाबतीत चांगले परिणाम देईल. नक्षत्रांची स्थिती उत्साहवर्धक असणार आहे. ज्येष्ठांची सेवा केल्याचे फळ मिळू शकेल. व्यावसायिक प्रगतीच्या अनेक उत्तम संधी मिळू शकतील. प्रवास अनुकूल ठरतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना ५ ग्रहांचे गोचर संपत्तीच्या बाबतीत समाधान मिळणार नाही. कोणत्याही अडचणीशिवाय महत्त्वपूर्ण नफा मिळेल. शैक्षणिक कार्यासाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे. प्रवासासाठी आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.