५ ग्रहांचे गोचर, २ राजयोग: ६ राशींना फेब्रुवारी फायदेशीर, यश-प्रगतीची संधी; सरकारी कामात लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 09:42 AM2024-01-26T09:42:48+5:302024-01-26T09:49:57+5:30

फेब्रुवारीमध्ये ५ महत्त्वाचे ग्रह गोचर करणार असून, ६ राशींना आगामी काळ उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

जानेवारी महिन्यात महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचराने महिनाभर अनेकविध विशेष, अद्भूत योग जुळून आले. यानंतर आता काही दिवसांनी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. हे ग्रहांचे गोचर अनेकार्थाने विशेष ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

फेब्रुवारीमध्ये ५ ग्रहांचे गोचर होत आहे. यामध्ये बुध, मंगळ, शनि, शुक्र आणि सूर्य यांचा समावेश आहे. महिन्याच्या सुरुवातीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. तर ५ फेब्रुवारीला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर ८ फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्तंगत येईल. ११ फेब्रुवारीला न्यायाधीश शनीदेव कुंभ राशीत अस्तंगत होतील.

१२ फेब्रुवारीला मकर राशीत शुक्र गोचरामुळे त्रिग्रही योग तयार होईल. यानंतर सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. २० फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. या ग्रहांच्या गोचराचा ६ राशीच्या लोकांना उत्तम लाभ मिळू शकतो. फेब्रुवारी महिना खूप फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक लाभासोबत कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. बुधादित्य आणि आदित्य मंगल योग प्रभावी ठरणार आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल. राजकारणात प्रभाव वाढेल. समाजातही प्रभाव वाढेल. लोकप्रियता वाढेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारीचा महिना शुभ फलदायी ठरू शकेल. परदेशात शिक्षण आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रा यांचा योग येईल. घरात काही शुभ कार्य होऊ शकतात. वडील किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून लाभ मिळू शकतात. हा महिना आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असेल.

कर्क राशीच्या व्यक्तींचा सन्मान वाढेल. कोणत्याही सरकारी क्षेत्रात लाभ आणि यश मिळेल. गुंतवणूक यश मिळवून देईल. या काळात नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीतही पूर्ण सन्मान मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना मुलांकडून आनंद मिळू शकतो. वैवाहिक जीवन आणि कुटुंबात उत्साहाचा मिलाफ राहील. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधात उत्साह राहील. नात्याला पुढे नेण्यासाठी योजना बनवू शकता. नोकरी व्यवसायात वाढ व लाभ मिळू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना अत्यंत फलदायी आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक असेल. शुक्राच्या प्रभावामुळे सुखाचे साधन वाढेल. आर्थिक बाजूही खूप मजबूत असेल. बचतही वाढेल. नोकरदार लोकांसाठीही महिना चांगला राहील, त्यांना लाभासोबत पूर्ण सहकार्य मिळेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्य, बुध आणि मंगळाचे संक्रमण करिअरमध्ये प्रगती आणि लाभाची शक्यता निर्माण करेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ असेल. वडिलांकडून लाभ मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबी यशस्वी होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.