५० वर्षांनी महाशिवरात्रीला चतुर्ग्रही योग: ९ राशींवर महादेव कृपा, बक्कळ लाभ; इच्छापूर्ती काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:52 IST2025-02-13T13:40:15+5:302025-02-13T13:52:52+5:30
mahashivratri 2025: महाशिवरात्रीला जुळून येत असलेल्या विशेष अद्भूत योगांमुळे अनेक राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ, सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. यंदा २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे.
या महाशिवरात्रीला शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. काही दाव्यांनुसार ५० वर्षांनंतर असा योग जुळून येणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध आणि नवग्रहांचा न्यायाधीश शनि यांचा त्रिग्रही योग सुरू असून, महाशिवरात्रीला चंद्र ग्रह कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे.
तसेच शनि स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत असल्याने शश नामक राजयोग जुळून आलेला आहे. तसेच सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे. या ग्रहस्थितीचा काही राशींना सकारात्मक पद्धतीने फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
मेष: थोड्याशा प्रयत्नाने प्रचंड यश मिळवू शकता. आयुष्यात तसेच करिअरमध्ये बरेच बदल घडून येऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकतो. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ: कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होऊ शकेल. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने होणारे प्रवास फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो.
मिथुन: देशात आणि परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. भागीदारी व्यवसायात नफा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे. धार्मिक आणि शुभ कार्यांसाठी संधी मिळतील. तसेच या काळात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होऊ शकेल. विचारपूर्वक पैसे गुंतवल्याने फायदा होईल. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.
कर्क: हा कालावधी वरदानापेक्षा अधिक चांगला ठरू शकेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणे टाळावे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. इतरांच्या कल्याणासाठी काम करेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते.
सिंह: मोठ्या भावांशी मतभेद होऊ देऊ नका. आक्रमकता वाढू शकते. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे. त्याचा फायदा घेऊ शकता. घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी मिळेल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासह सहलीला जाऊ शकता, वेळ अनुकूल आहे. अपेक्षित यश मिळू शकेल.
तूळ: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर चांगल्या संधी मिळू शकतील. राजकारण्यांशी संबंध वाढतील. या काळात परदेश प्रवास आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. तिथे इच्छा पूर्ण होतील.
धनु: नवीन मित्र बनतील. मित्र किंवा कुटुंबासह फिरायला जाऊ शकता. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ती बदलणे फायदेशीर ठरू शकते. आयुष्यात आनंद आणि समाधान येऊ शकते. भरपूर पैसे कमवाल आणि ते वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. काम आणि व्यवसाय परदेशांशी जोडलेले आहे त्यांना चांगले फायदे मिळू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. हा काळ खूप शुभ आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्यावा.
मकर: या काळात शत्रूंचा पराभव होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. मीडिया, मार्केटिंग, लेखन किंवा सोशल मीडियाशी संबंधित क्षेत्रात काम करत असाल तर या काळात खूप फायदे मिळू शकतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
कुंभ: अनेकविध बाबतीत यश मिळवू शकता. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. घरात सुख-शांतता राहू शकेल. प्रेम जीवन चांगले राहू शकेल. करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीसह पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.
मीन: लोकप्रियता मिळू शकेल. समाजात आदर मिळू शकेल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मानसिक शांतता मिळू शकेल. भागीदारीच्या कामात फायदा होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.