५०० वर्षांनी अद्भूत योग: ७ राजयोग, ७ राशींना वरदान; लक्ष्मी अपार कृपा करेल, दिवाळी शुभ ठरेल! By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 07:07 AM 2023-11-10T07:07:07+5:30 2023-11-10T07:07:07+5:30
दिवाळीत गजकेसरी, महालक्ष्मी, धनयोग असे शुभ योग असून, आर्थिक आघाडी, नोकरी, करिअरमध्ये सर्वोत्तम संधी मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीला नवग्रहांपैकी ७ ग्रहांचे ७ राजयोग जुळून येत आहेत. सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ, शुक्र, शनी आणि केतु या ७ ग्रहांच्या विविध युतींनी युक्त असे ७ प्रकारचे राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांमुळे धनत्रयोदशीसह दिवाळीचा काळ अतिशय अद्भूत ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सुमारे ५०० वर्षांनी असा दुर्मिळ शुभ योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे.
७ ग्रहांच्या दिव्य संयोगामुळे दिवाळीत अनेक राशींवर लक्ष्मी देवीची अपार कृपा होऊ शकेल. धन-धान्य, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव यांसह सर्वोत्तम अशा संधी प्राप्त होऊ शकेल. आर्थिक आघाडी, नोकरी-व्यवसाय, करिअर-बिझनेस अशा जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दिवाळी शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
दीपोत्सवात नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजे मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शश नावाचा राजयोग जुळून आला आहे. तर नवग्रहांचा राजा सूर्य आणि सेनापती मानला गेलेला मंगळ तूळ राशीत असून, या दोन्ही ग्रहांच्या युतीचा आयुष्मान राजयोग जुळून आला आहे.
नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत आहे. दिवाळीत चंद्राचे भ्रमण कन्या आणि तूळ राशीतून होणार आहे. तूळ राशीत चंद्राने प्रवेश केल्यानंतर मेष राशीतील गुरुची शुभ दृष्टी पडून गुरु आणि चंद्राचा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्यामुळे समसप्तक योगही जुळून येत आहे.
तूळ राशीतील विराजमान असलेल्या मंगळ आणि चंद्र या दोन्ही ग्रहांच्या युतीचा महालक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल. कन्या राशीत आताच्या घडीला शुक्र आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे चंद्र, शुक्र आणि केतु यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. हाही एक उत्तम योग मानला जातो.
कन्या राशीत असलेल्या शुक्र ग्रहाशी चंद्र ग्रहाच्या युतीने धन योगही जुळून येत आहे. याशिवाय प्रीती योग तसेच हस्त नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येणार आहे. दीपोत्सवात ७ ग्रहांचा ७ प्रकारचे शुभ मानले गेलेले योग जुळून येत असून, याचा ७ राशींना अतिशय उत्तम लाभ मिळू शकतो. पैकी काही राशींना २०२४ च्या सुरुवातीपर्यंतचा काळ सर्वोत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...
मेष: आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्न दुप्पट होऊ शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना काही विशेष सौदे मिळू शकतात. एकामागून एक अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जुन्या मित्रांकडूनही लाभ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रयत्नांना चांगले यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विरोधकांवर विजय मिळवाल. महत्त्वाच्या योजनाही आखू शकाल. शक्य झाल्यास लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करून शंख, कवड्यांची माळ, कमळाचे फूल अर्पण करावे. लक्ष्मी चालिसाचे पठण किंवा श्रवण करावे.
मिथुन: चांगला काळ सुरू होईल. भूतकाळात झालेले आर्थिक नुकसान या काळात भरून निघण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील मिळतील. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणारे लोक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एवढेच नाही तर या काळात केलेल्या कामात यश मिळेल. शक्य असेल तर लक्ष्मी देवीचे नियमित पूजन करावे. नामस्मरण, लक्ष्मी मंत्रांचा जप करावा.
कर्क: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होतील. अपूर्ण कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. कुटुंबासाठी नवीन वाहन किंवा नवीन दागिने खरेदी करू शकता. कठोर परिश्रमाला नशिबाची साथ लाभेल. वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरदार लोकांना ऑफिसकडून दिवाळी पार्टी मिळू शकते. काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने कुटुंबात सन्मान वाढेल. देवी लक्ष्मीला आवडत्या वस्तू अर्पण करा. लक्ष्मी रक्षा कवच पठण किंवा श्रवण करा.
कन्या: नशिबाची भक्कम साथ लाभेल. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल. मित्राकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यस्त असूनही कुटुंबातील सदस्यांसाठी आणि मुलांसाठी वेळ काढू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता. मित्रांसोबत दिवाळी पार्टीला जाण्याची संधी मिळेल. नोकरीच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. शक्य असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि देवाजवळ तुपाचा दिवा लावावा.
तूळ: सरकारी क्षेत्रातून लाभ मिळेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते दिवाळीनंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादींचे फायदे मिळतील. वैवाहिक जीवनही छान असणार आहे. नात्यातील सर्व अंतर संपणार आहे. आगामी काळ करिअरसाठी खूप लकी ठरू शकेल.
मकर: नशिबाची साथ मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. असे काही काम कराल ज्यामुळे समाजात सन्मान होईल. पत आणि प्रतिष्ठा वाढेल. समस्यांतून दिलासा मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासामुळे शिक्षणात चांगली कामगिरी करतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आईसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता.
मीन: आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कोणतेही काम कराल, त्यात नक्कीच यश मिळेल. सामाजिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊ शकाल. आदर वाढेल. व्यावसायिकांची चांदी होईल, चांगला नफा मिळून आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांना कार्यालयात दिवाळी पार्टी मिळू शकते. अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील. लक्ष्मीची देवीची मनोभावे पूजा करून 'ॐ श्रीं श्रेय नम' मंत्राच्या पाच माळा जप करावा.
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दीपोत्सवाच्या मोठ्या सण-उत्सवासह विनायकी चतुर्थी, पांडव पंचमी, भानुसप्तमी, दुर्गाष्टमी, प्रबोधिनी एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव, चातुर्मास समाप्ती, तुलसीविवाहारंभ, वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा, कार्तिक संकष्ट चतुर्थी असे अनेक सण, व्रते साजरी केली जाणार आहेत.
- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.