१०० वर्षांनी ६ ग्रहांचा दुर्लभ योग: ९ राशींना अनुकूल, सकारात्मक; भरघोस लाभ, सर्वोत्तम काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:06 IST2025-02-26T10:51:51+5:302025-02-26T11:06:46+5:30
मार्च महिन्यात ६ ग्रह एकाच राशीत येणार असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना सर्वांत महत्त्वाचा मानला जात आहे. मार्च महिन्याची सांगता होताना शनि राशी परिवर्तन करणार आहे. शनिचे राशीपरिवर्तन करणे अनेकार्थाने महत्त्वाचे आणि विशेष मानले जात आहे. तसेच मार्च महिन्याच्या अखेरीसच मीन राशीत एकाचवेळी ६ ग्रहांचा दुर्लभ योग जुळून आला आहे.
काही मान्यतांनुसार असा योग सुमारे १०० वर्षांनी जुळून आला आहे. तसेच मीन राशीतच अनेक शुभ योग, युती योग, राजयोग जुळून येत आहेत. आताच्या घडीला मीन राशीत बुध, शुक्र, राहु, नेपच्युन असे ग्रह विराजमान आहेत. यामुळे लक्ष्मी नारायण योग, बुध, शुक्र आणि राहु यांचा त्रिग्रही युती योग जुळून आलेला आहे.
मार्च महिन्याच्या मध्यावर नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे. यामुळे सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच होळीनंतर बुध वक्र होत आहे. बुधाचा नीचभंग योगही जुळून आलेला आहे. या सर्व घडामोडींचा विचार करता काही राशींना ग्रहांची ही युती सर्वोत्तम फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
वृषभ: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. निविदा मिळू शकतात. व्यावसायिक लोक काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात, जे शुभ ठरतील. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. उत्पन्नात वाढ झालेली दिसू शकेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. करिअरमध्ये मोठे लाभ मिळू शकतात.
मिथुन: स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकाल. कामाच्या संदर्भात अनेक प्रवास करावे लागू शकतील. याचा खूप फायदा होऊ शकेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. पदोन्नती होऊ शकेल. व्यवसायाच्या क्षेत्रात खूप नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात झपाट्याने वाढ दिसून येऊ शकेल. शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा होऊ शकतो. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते.
कर्क: भाग्योदय होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आध्यात्मिक प्रगती आणि प्रवासाची दाट शक्यता आहे. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता राहील. व्यवसायातील आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.
सिंह: नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. यातून चांगला नफा कमवू शकता. समाजात आदर वाढेल. अचानक आर्थिक लाभ होईल. अडकलेले पैसे तिथे परत मिळू शकतात. गुंतवणूक आणि नवीन योजनांमधून फायदा होऊ शकेल. सरकारी कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.
तूळ: बऱ्याच काळापासून करत असलेले काम यशस्वी होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील, ज्यामुळे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यवसायात यश मिळू शकते. इच्छा पूर्ण होऊ शकतात. आनंददायी घटना घडू शकतात. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: काही चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांना या काळात सकारात्मकता लाभू शकते. तसेच, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. कारकिर्दीत एकामागून एक अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरू शकेल. अनपेक्षित स्रोताकडून लाभ मिळू शकतील.
धनु: भौतिक सुखे मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात गुंतवणूक आणि नवीन योजनांचा फायदा होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात आई आणि सासू-सासऱ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित काम असेल तर चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील. रखडलेले काम गती घेईल.
कुंभ: अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्ता आणि जमिनीतून फायदा होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती मिळू शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आध्यात्मिक प्रगती आणि प्रवासाची दाट शक्यता आहे. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने एखादे रत्न धारण करू शकता. आयात-निर्यात कामात यश मिळेल. तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. नोकरी आणि व्यापारात परिस्थिती अनुकूल राहील.
मीन: खूप फायदे मिळू शकतात. निर्णय क्षमतेत झपाट्याने वाढ होऊ शकेल. लोक विचारांनी प्रभावित होतील. यासोबत शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतील. केलेल्या मेहनतीच्या आधारे बरेच लाभ मिळू शकतात. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.