१२ वर्षानंतर गुरु स्वराशीत वक्री: राजयोगाचा ‘या’ ३ राशींना लाभच लाभ; अपार पैसा, शुभच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:05 PM2022-09-16T15:05:43+5:302022-09-16T15:10:32+5:30

गुरुच्या वक्री चलनामुळे केंद्र त्रिकोणीय राजयोग जुळून येत असून, काही राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह नियमित कालावधीनंतर स्थानबदल, राशीबदल, चलनबदल करत असतो. काही ग्रहांचे चलन आणि राशीपरिवर्तन केवळ राशींवर नाही, तर संपूर्ण जगावर प्रभाव पाडणारे असते, असे सांगितले जाते. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशीत वक्री आहे. (jupiter retrograde in pisces 2022)

गुरुच्या मीन राशीतील वक्री होण्याने केंद्र त्रिकोणीय राजयोग तयार होत असून, याचा काही राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला फायदा होऊ शकेल. असे सांगितले जात आहे. गुरु तब्बल १२ वर्षानंतर स्वराशीत वक्री झाला आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत गुरु मीन राशीत विराजमान असणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूच्या वक्री हालचालीचा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल, परंतु ३ राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल. या तीन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या व्यवसाय आणि व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. (guru vakri in meen rashi 2022)

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री चलनाने तयार होत असलेला राजयोग यशकारक ठरू शकतो. या काळात नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन उपक्रम नफा मिळवून देऊ शकतात. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.