Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:31 IST2025-04-17T11:54:39+5:302025-04-17T12:31:56+5:30
Shani Nakshatra Transit 2025: यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा शुभ मुहूर्त पाच राशींसाठी धनलाभाची संधी घेऊन येत आहे. कारण २८ एप्रिल रोजी शनी महाराज नक्षत्र(Shani Nakshatra Transit 2025) बदलणार आहेत. हे स्थित्यंतर पाच राशींना अक्षय्य आनंद देणारे ठरणार आहे.

अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय कधीच होत नाही. म्हणून या दिवशी सोने खरेदीला जास्त महत्त्व असते. मात्र सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते घेण्याची हिंमत कोण करणार हा प्रश्नच आहे. मात्र शनी देवाच्या कृपेने पाच राशींना अक्षय्य तृतीयेपूर्वीच धनलाभाची संधी मिळत असल्याने ते या संधीचे सोने करतील हे नक्की!
मीन राशीत संक्रमण केल्यानंतर, शनि महाराज आता नक्षत्र बदलणार आहेत. २८ एप्रिल रोजी शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रात, शनि महाराजांना उत्तरभाद्रपद नक्षत्राचे स्वामी मानले जाते. शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप प्रभावशाली मानले जात आहे. या बदलाचा परिणाम देश आणि जगावर तसेच सर्व राशींवर होईल. ३ ऑक्टोबरपर्यंत शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात राहील.
मकर आणि कुंभ राशीसह ५ राशींसाठी शनीचे भ्रमण खूप अनुकूल मानले जाते. या काळात, या राशींच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच नोकरी, व्यवसायात, प्रपंचात येत असलेल्या समस्या देखील सुटतील. चला तर मग पाहूया की शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या ५ राशींना फायदा होणार आहे...
मेष :
अलीकडेच मेष राशीची साडे साती सुरु झाली आहे. तरीदेखील शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी सेवा, प्रशासन, शिस्त किंवा तांत्रिक क्षेत्रांशी संबंधित लोकांना स्थिरता मिळू लागेल. जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी संघर्ष होण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळेस मौन पाळले तर निश्चित लाभ होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि जुने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील. ज्यामुळे धनलाभाचे संधी आहे.
मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप शुभ राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा नक्षत्र बदल खूप चांगला काळ घेऊन येत आहे. तुम्ही तुमचे जुने काम पुन्हा सुरू करू शकता आणि नोकरीशी संबंधित समस्या सहजपणे सोडवू शकता. कुटुंबात आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही तुमचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल खूप शुभ मानला जातो. हा काळ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या, उच्च स्थान आणि कामाच्या ठिकाणी यश, कीर्ती देऊ शकतो. आर्थिक लाभाच्या संधी तुमच्याकडे चालून येतील. प्रशासन, कायदा सल्लागार, संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे सुटतील किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता नफा देऊ लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देतील.
मकर :
उत्तराभाद्रपद नक्षत्रातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यदायी ठरेल. अलीकडेच या राशीच्या लोकांची साडेसाती सुटल्यामुळे शनीच्या संक्रमणाची अनेक शुभ फळे त्यांना मिळतील. दैनंदिन जीवनातील समस्या संपतील आणि त्यांचे आरोग्य देखील सुधारेल. शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे तुमच्या धाकट्या भावंडांशी चांगले संबंध राहतील. मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांची संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. सर्व क्षेत्रात त्यांची क्षमता वेगाने वाढेल आणि अनेक स्रोतांमधून नफा मिळवू शकतील.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप फायदेशीर ठरेल. या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा परिस्थितीत, या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि ते त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करू शकतील. करिअरमधील जुन्या समस्या आता संपू शकतात. कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल. पैसे संग्रह तसेच गुंतवणुकीत ते यशस्वी होतील आणि वेगवेगळ्या स्रोतांमधून नफा मिळवू शकतील. परदेशातून पैसे कमविण्याच्या अनेक संधी येऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात स्थिरता येईल. यासोबतच, तुम्हाला वित्त संबंधित विविध योजनांचाही खूप फायदा होऊ शकतो.