Vastu Tips : पाकिटात कधीही ठेवू नका 'या' चार वस्तू; बिलकूल टिकणार नाही पैसा By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:14 PM 2022-03-12T12:14:41+5:30 2022-03-12T12:24:53+5:30
Vastu Tips : भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम करतात. भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम करतात. आपण रोज वापरत असलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पैशांचे पाकिट. लोक आपल्या पाकिटात पैशांशिवाय क्रेडिट/डेबिट कार्डांची बिलं, खरेदीची जुनी बिले, तिकिटे, कुटुंबीयांच्या फोटोंपर्यंत अनेकविध गोष्टी ठेवत असतात.
ज्या गोष्टी आपण आपल्या पाकिटात ठेवल्या तर आपल्याला समस्या निर्माण होऊ शकतील, अशा गोष्टींबद्दलही वास्तुशास्त्र माहिती देतं. या वस्तू पाकिटामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार पाकिटामध्ये पैशांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू ठेवल्यास आर्थिक समस्या सहन कराव्या लागू शकतात. एवढेच नाही तर जीवनात अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या पाकिटामध्ये ठेवणं अशुभ आहे.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही देवाचा फोटो आपल्या पाकिटामध्ये ठेवू नये. पाकिटामध्ये देवाचा फोटो ठेवल्याने कर्ज होऊ शकते आणि तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं मानलं जातं.
काही लोक आपल्या जवळच्या निधन झालेल्या व्यक्तीचाही फोटो त्यांच्या पाकिटात ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, पाकिटामध्ये निधन व्यक्तींचे फोटो ठेवणेदेखील टाळलं पाहिजे. वास्तुशास्त्रात हे अशुभ मानलं गेलं आहे. असं म्हटले जातं की जर एखाद्यानं निधन झालेल्या व्यक्तीचा फोटो ठेवला तर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
पाकिटात चाव्या ठेवणं हीदेखील सामान्य बाब आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार असं करणं टाळलं पाहिजे. पाकिटात चावी ठेवल्यानं जीवनात नकारात्मकता येते असं मानलं जातं. असं केल्यानं व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो.
अनेकदा काही व्यक्तींना कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांची बिलं, जुनी तिकिटं पाकिटात ठेवण्याची सवय असते. वास्तुशास्त्रात असं करणंही अशुभ मानलं गेलंय. पाकिटात जुनी बिलं ठेवल्यानं देवी लक्ष्मीची कृपा होत नाही, असं म्हटलं जातं.