गणेशोत्सवाची सांगता: ६ राशींना वरदान काळ, वर्षभर मिळेल लाभ; जाता जाता बाप्पा शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 07:07 AM2024-09-17T07:07:07+5:302024-09-17T07:07:07+5:30

Anant Chaturdashi 2024 End Of Ganesh Utsav 2024 Astrology: गणेशोत्सवाची सांगता होताना कोणत्या राशींना बाप्पाची अपार कृपा लाभू शकते. शुभ पुण्य फल प्राप्त होऊ शकते, जाणून घ्या...

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होत आहे. शेकडो मंडळे आणि हजारो घरातील गणरायांना निरोप देण्यात येत आहे. यंदाच्या गणपती उत्सवात गणेशाची जी सेवा केली, त्याबाबत समाधानाचा भाव मनात असणार आहे. परंतु, बाप्पा परतण्याचे दुःख तितकेच असणार आहे. ज्या काही चुका झाल्या असतील त्याबाबत मनापासून क्षमायाचना करून बाप्पाची कृपा कायम राहावी, यासाठी प्रार्थना केली जाते.

Ganesh Utsav 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. हा काळ कन्या संक्रांत म्हणून ओळखला जातो. गुरु वृषभ राशीत आहे. शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहेत. चंद्रही कुंभ राशीत असेल. हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, बुध सिंह राशीत आहे. राहु आणि केतु अनुक्रमे मीन तसेच कन्या राशीत आहेत.

एकंदरीत ग्रहस्थिती आणि अनंत चतुर्दशीला बाप्पा देण्यात येणारा निरोप काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो. बाप्पा आपल्या घरी परत जाताना काही राशींवर अपार कृपा करू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशी लकी ठरू शकतील? ते जाणून घेऊया...

मेष: अत्यंत सतर्क राहावे लागेल. कार्यक्षेत्री कामात ज्या व्यक्ती खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतात, त्या व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. विवादापासून दूर राहणे हिताचे होईल. व्यापारातील देवाण-घेवाण करताना सावध राहावे, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. घरगुती चिंता सतावू शकतात. आरोग्य व संबंध ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेम संबंधात सामंजस्य दाखवावे. प्रेमिकेच्या भावनांकडे लक्ष द्यावे. दांपत्य जीवनात जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात, ज्यात दमछाक होऊ शकते.

वृषभ: कामे करण्यासाठी इतरांशी मिळून-मिसळून राहावे लागेल, मग ते घरातले असो किंवा कार्यालयीन. नोकरीत बदल करावयाचा असेल तर परिस्थितीचा अभ्यास करून विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी प्रियजन किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. घाईघाईत किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वाहन चालवताना सतर्क राहावे लागेल. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदार पाठीशी राहील. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन: आगामी काळ अत्यंत आव्हानात्मक असण्याची संभावना आहे. कारकीर्द किंवा व्यावसायिक क्षेत्रात प्रवास करावे लागू शकतात, ज्यात थकवा जाणवण्याची संभावना आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यालय व घर यात समतोल साधण्यात काही अडथळे येऊ शकतात. सुख-सुविधेसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो व त्यामुळे अंदाजपत्रक कोलमडू शकते. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकेल. व्यापाराचा विस्तार करू इच्छित असाल तर त्यासाठी एखाद्या विशेष व्यक्तीचे किंवा मित्राचे सहकार्य मिळेल. प्रेमिकेचे प्रेम व विश्वास वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल.

कर्क: भरपूर मेहनत करावी लागेल. आळस व इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर कार्य करत असाल तर वेळेवर व योग्य रीतीने त्याची पूर्तता होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्राप्तीच्या साधनांवर काही प्रतिबंध लागू शकतात. व्यवसायात स्पर्धकांचा तगडा मुकाबला करावा लागू शकतो. प्रवास करत असाल तर त्या दरम्यान प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी लागेल. वाणीवर व वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वाद होऊ शकतो. कुटुंबियांसह एखादा धार्मिक प्रवास किंवा एखादी सहल होण्याची संभावना आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह: आगामी काळ आनंददायी असण्याची शक्यता आहे. घरात धार्मिक व मांगलिक कार्य होऊ शकतात. शासनाशी संबंधित एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असलात तर स्वप्नपूर्ती होऊ शकते व त्यातून अपेक्षित लाभ होऊ शकतो. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने प्रेमात व सामंजस्यात सुधारणा होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. मुलांसंबंधी एखादी मोठी चिंता दूर झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

कन्या: नवीन संधींचे द्वार उघडणारा काळ आहे. कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्यासाठी अपेक्षित प्रस्ताव येऊ शकतात. कामे वेळेवर पूर्ण झाल्याने उत्साह व पराक्रमाची भावना जागरूक होईल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वृद्धीची योजना तयार होऊ शकते. व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागू शकतात, मग ते जवळचे असोत किंवा दूरवरचे. प्रवास सुखद व लाभदायी होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. धार्मिक गोष्टींची गोडी लागेल. कुटुंबियांसह एखादी तीर्थयात्रा करू शकता.

तूळ: आगामी काळ सौख्यदायी व सौभाग्यदायी आहे. कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होऊ शकते. एखाद्या मित्राच्या मदतीने मोठ्या योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. अपेक्षित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती मिळाली तर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सुख-सुविधांशी संबंधित वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. युवकांचा अधिकांश वेळ मस्ती व आनंदात जाईल. मन धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतले जाऊन त्यात जास्त सक्रिय व्हाल. समाजात प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. पूर्वीपासून असलेल्या आर्थिक समस्यांचे निराकरण यशस्वीपणे कराल. मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल. प्रेम संबंधात वृद्धी होईल. दांपत्य जीवन सुखद होईल.

वृश्चिक: जीवनात एखादे महत्वाचे परिवर्तन व अडचणींसमोर आव्हानांचा सामना घडवून आणणारा आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता त्यास एका संधीच्या नजरेने बघावे. अहंकार सोडून इतरांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. अचानकपणे घर दुरुस्ती करण्यात जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रेम संबंधात सतर्क राहा. प्रेमाचे प्रदर्शन लोकांसमोर करू नका, अन्यथा काही त्रास होऊ शकतो. दांपत्य जीवन सुखद होईल. असे असले तरी कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत मन चिंतीत होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनु: विविध संधी व आव्हानांसह मिश्र फलदायी आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने काही साध्य केल्याने मान-सन्मान वाढेल. घरात धार्मिक व मांगलिक कार्ये होतील. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने जमीन-जुमल्याशी संबंधित वादात समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीसाठी मित्र व कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे मन चिंताग्रस्त होईल. त्याचबरोबर प्राप्ती कमी होऊन खर्च वाढू शकतात. अंदाजपत्र अस्थिर होऊ शकते. प्रेम संबंधात काही अडथळे येऊ शकतात. प्रेमिकेची भेट न झाल्याने मन बेचैन होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहिले तरी कडू-गोड वाद होऊ शकतात.

मकर: मन एखादा घरगुती वाद किंवा कार्यक्षेत्राशी संबंधित जवाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत त्रासून जाईल. कामात चुका होऊ शकतात. अशा वेळी वाणी व वागणूक पूर्णतः नियंत्रणात ठेवावी लागेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे लागेल. वायफळ खर्च टाळावे लागतील. एखाद्या मित्राच्या मदतीने गैरसमजातून बाहेर पडून आपल्या कार्यक्षेत्री योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमिकेशी थोडे वाद झाले तरी प्रेम टिकून राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. दिनचर्येचे योग्य पालन करावे.

कुंभ: कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी किंवा ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी जास्तीचे परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात प्रगती होताना दिसेल. घरगुती चिंतेने मन काहीसे त्रस्त होईल. त्यातून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल, ज्याच्या मदतीने भविष्यात लाभदायी योजनेत सहभागी होऊ शकाल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. प्रेमिकेस भेटण्यात अडचणी येतील, ज्यामुळे मन काहीसे खिन्न होईल. नंतरचा कालावधी शुभ फलदायी असून तिच्या सहवासात हसत-खेळत जास्त वेळ घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल.

मीन: अनुकूल कालावधी आहे. रोजंदारीच्या आड येणारी मोठी अडचण दूर झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय विस्ताराची योजना तयार कराल. सुख-सोयींसाठी लागणाऱ्या वस्तूंवर पैसा खर्च करावा लागेल. जमीन-जुमल्याशी संबंधित वादांचे निराकरण होईल. परदेशात कारकीर्द घडवू इच्छितात, त्यांची इच्छापूर्ती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना विशेष लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीची झालेली भेट प्रथम मैत्रीत व नंतर प्रेमात परिवर्तित होऊ शकते. पूर्वीपासून प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम समन्वय असल्याचे दिसून येईल. लोक जोडीचे कौतुक करतील. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालवू शकाल.