अंगारकी संकष्टी चतुर्थी: ५ मूलांकांवर गणेशकृपा, उत्तम लाभ; फायदेशीर काळ, बाप्पा शुभच करेल! By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:22 PM 2024-06-23T15:22:36+5:30 2024-06-23T15:33:17+5:30
Numerology: मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी असून, कोणत्या मूलांकांना हा काळ सर्वोत्तम लाभाचा, शुभ फलदायी ठरू शकेल? जाणून घ्या... Numerology: जून महिन्याची सांगता होत असताना बुध कर्क राशीत जाईल. आताच्या घडीला ग्रहस्थिती अशी- मंगळ मेषेत, गुरू आणि हर्षल वृषभेत, रवी, शुक्र आणि बुध मिथुन राशीत, कालांतराने बुध मिथुनेतून कर्क राशीत जाईल. केतू कन्येत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
२५ जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तर, मंगळवारी उत्तर रात्रौ १ वाजून ४९ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पूर्ण काळ पंचक राहील. अंगारक संकष्ट चतुर्थी अतिशय शुभ तसेच पुण्यफलदायी मानली जाते. हे व्रत केल्याने बाप्पाची अपार कृपा लाभू शकते, अशी मान्यता आहे. या काळात अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांना उत्तम संधी, यश-प्रगती, फायदा प्राप्त होऊ शकतो, ते जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. गरजेपेक्षा कोणावरही विश्वास ठेवू नका. नातेसंबंध सुधारतील आणि समाधानी राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. आर्थिक आघाडीवरील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. खर्चांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. विचार न करता आपले मत कोणालाही देऊ नका. विद्यार्थ्यांनी झटकून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ध्यानधारणा, योगासने यांवर भर देणे हिताचे ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. मेहनतीच्या जोरावर आर्थिक स्थिती सुधारेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप व्यस्ततेचा ठरू शकेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. भागीदारीत केलेली कामे अनुकूलता आणू शकतील. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील. धनवृद्धीसाठी शुभ संधी मिळतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कामाचा ताण वाढू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. हाती घेतलेली कामे कालांतराने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. नवीन व्यवसाय योजना बनवण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन काम सुरू करणार असाल तर यश मिळू शकते. नोकरदार लोकांना काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची प्रेरणा मिळू शकेल. चांगली संधी मिळू शकते. मन शांत राहील. सकारात्मकता जाणवेल. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणामुळे खर्च जास्त होऊ शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. ऑफिसमधील वरिष्ठ कामावर खुश होतील. प्रशंसा होऊ शकते. ही बाब प्रेरणादायी ठरू शकेल. व्यावसायिक काही नवीन निर्णय घेऊ शकतात. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ ठरू शकेल. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल राहू शकेल. मन प्रसन्न राहू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. कार्यालयातील आत्मविश्वास वरिष्ठांना प्रभावित करू शकतो. काही नवीन योजनांवर चर्चा करू शकता. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाशी संबंधित काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीसह मान-सन्मान वाढू शकेल. शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामात कोणताही बदल करणे आव्हानात्मक असू शकते. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल राहू शकेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यश, प्रगतीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. वैयक्तिक गोष्टी कोणाशीही जास्त शेअर करू नका. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, अन्यथा निराशा पदरी पडू शके. चांगले यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. हे समजून घ्यावे लागेल की यश, प्रगती साध्य करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कार्यक्षेत्रातील यशाने मान सन्मान मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.