अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:56 PM2024-07-08T18:56:01+5:302024-07-08T19:05:50+5:30

Angarki Vinayaka Chaturthi 2024 Ashadhi July 2024: अंगारकी विनायक चतुर्थीला कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? कोणते विशेष योग जुळून येत आहेत? जाणून घ्या...

Angarki Vinayaka Chaturthi 2024 Ashadhi July 2024: जुलैमधील आषाढ शुद्ध चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी येणारी विनायक चतुर्थी विशेष महत्त्वाची ठरली आहे. ०९ जुलै २०२४ रोजी अंगारकी विनायक चतुर्थी आहे. गणेश व्रतांमध्ये चतुर्थी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजन केले, तर बाप्पाचे शुभाशिर्वाद मिळतात, असे म्हटले जाते.

अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी रवियोग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे.

विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी गणपतीचे पूजन, नामस्मरण, उपासना केल्यास गणपती बाप्पाासह मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच मंगळवार असल्याने अनेक ठिकाणी हनुमंतांचे पूजनही केले जाते. अंगारक योगातील विनायक चतुर्थी कोणत्या राशींसाठी अतिशय शुभ फलदायी, लाभाची ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष: कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकेल. वडिलांचे आणि शिक्षकांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकेल. मित्रांशी बोलताना महत्त्वाची माहिती मिळेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकाल. जोडीदाराशी नाते मजबूत होऊ शकेल. मन प्रसन्न होईल. अनेक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृषभ: अंगारकी विनायक चतुर्थीचा दिवस सर्वसाधारणपणे फलदायी ठरू शकेल. कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी आगामी काळ प्रगतीकारक असेल. अचानक पैसे मिळू शक्यता आहे.

मिथुन: कामात प्रगती होऊ शकेल. उत्पन्न चांगले राहू शकेल. खर्चात थोडीशी कपात करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाधान वाटू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळू शकतील.

कर्क: इतरांशी मोकळेपणाने बोलू शकाल. कुटुंबातील वाद ज्येष्ठांच्या मदतीने संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भावंडांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. विरोधक पराभूत होऊ शकतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काळ अनुकूल ठरू शकेल. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. एखाद्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: मनोकामना पूर्ण होऊ शकतील. मान-सन्मान वाढेल. गुंतवणूक करायची असेल तर, भविष्यात फायदे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी कळेल. नोकरदार आणि व्यावसायिक क्षमता दाखवू शकतात. प्रभाव वाढून आर्थिक लाभ होऊ शकेल. जमीन आणि वाहन खरेदी करायचे असेल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते. पालकांसोबत वेळ घालवण्याची आणि महत्त्वाची चर्चा करण्याची संधी मिळेल.

कन्या: कुटुंबात तसेच जोडीदारासोबतचे नाते मजबूत होऊ शकते. काही लोक तुमच्यातील कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमच्याचविरुद्ध काही खेळी खेळू शकतात. त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

तूळ: नोकरदारांनी कामात अधिक सावध राहणे हिताचे ठरू शकेल. विरोधक सक्रिय होऊन त्रास देण्याचा प्रयत्न करतील. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगितले जात आहे.

वृश्चिक: आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नोकरदारांना काम करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालावधी चांगला ठरू शकेल. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरू शकेल.

धनु: अंगारकी विनायक चतुर्थी फलदायी ठरू शकेल. काही अडचणी कमी होऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी काळ चांगला ठरू शकेल. प्रमोशन मिळू शकते. व्यापारी वर्गासाठी हा कालावधी प्रगतीकारक ठरू शकेल.

मकर: अंगारकी विनायक चतुर्थी फलदायी ठरू शकेल. नोकरदारांना हा काळ चांगला ठरू शकेल. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. आणखी मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे.

कुंभ: विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्याचे सकारात्मक, चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरणार नाही. महत्त्वाच्या कामांसाठी प्रवास करायचा असल्याचे वेळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.

मीन: अंगारकी विनायक चतुर्थी फलदायी ठरू शकेल. काम आणि कुटुंब यांच्यात समन्वय राखू शकाल. नोकरी आणि व्यवसायात नवीन ऑफर मिळू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.