Ashadhi Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' हे समीकरण तयार झाले आहे, ते आषाढी एकादशीमुळे! अर्थात यात दोष एकादशीचा नसून समस्त खवय्यांचा आणि सुगरणींचा आहे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, उपासाच्या पापड्या, थालिपीठ, काकडीची कोशिंबीर, रताळ्याच्या गोड फोडी, शिंगाड्याचा शिरा, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी असे शेकडो प्रकारांची रेलचेल असल्याने भरपेट एकादशी पार पडते. गंमतीचा भाग वेगळा. पण उपासाला जोड असावी लागते, ती उपासनेची! यंदाही वारीला जाता येत नसल्याने अनेक भाविकांना रुखरुख लागली आहे. पण वाईट वाटून घेऊ नका. तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे...न लगे सायास जाणे वनांतरा,सुखे येतो घरा नारायण।