शिवरात्रीला अद्भूत संयोग: ५ राशींवर महादेवांची अपार कृपा, धनलाभ अन् भाग्योदयाचे शुभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:19 PM2023-07-13T12:19:35+5:302023-07-13T12:29:21+5:30

आषाढ महिन्यातील शिवरात्रीला शुभ योग जुळून येत आहे ५ राशींना ही शिवरात्री शुभ-लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या...

चातुर्मास सुरू आहे. आषाढ महिन्यातील शिवरात्रीला अद्भूत योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे शिवरात्री आणि शनिप्रदोष एकाच दिवशी येत असल्याचे हा विशेष योग मानला जात आहे. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला ग्रह म्हणजे शनी. शनी हा महादेवांना गुरु मानतो, अशी मान्यता आहे.

शनिप्रदोष आणि शिवरात्री एकत्र आल्याने महादेवासह शनीपूजन केल्यास त्याचे उत्तम लाभ मिळू शकतात. शनीची महादशा, साडेसाती, ढिय्या प्रभाव असलेल्यांनी शनिप्रदोष दिवशी शनीसह महादेवांची आराधना, नामस्मरण केल्यास शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्त होण्यास मदत मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

आषाढ महिन्यातील शिवरात्रीला अद्भूत शुभ योग जुळून येत असून, यामुळे काही राशीच्या व्यक्तींवर महादेवांची अपार कृपा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. आर्थिक स्थिती बळकट होऊ शकते. नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. तसेच अचानक पैसे मिळू शकतात. अडकलेली येणी मिळू शकतात.

१५ जुलै २०२३ रोजी शिवरात्री आहे. या दिवशी रुद्राभिषेक केल्यास विशेष फळ मिळते. शिवरात्रीला अतिशय शुभ मानला गेलेला शुभ वृद्धी योग जुळून येत आहे. शिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जुलै रोजी नवग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करून कर्क संक्रांती सुरू होईल. हा एक अतिशय शुभ योग मानला जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार, ही शिवरात्री ५ राशींसाठी सर्वांत खास ठरू शकेल. जाणून घेऊया...

सिंह राशीच्या व्यक्तींना शिवरात्री लकी ठरू शकते. भगवान शिवाच्या कृपेने नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळू शकेल. उत्पन्न वाढू शकेल. आर्थिक लाभासह आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगती होईल. एखादी नवीन मोठी डील करू शकता. जी कालांतराने खूप फायदेशीर ठरू शकते.

कन्या राशीच्या व्यक्तींना शिवरात्री लाभदायक ठरू शकेल. भगवान शंकराची विशेष कृपा राहील. नोकरीत बढती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. कौटुंबिक संबंध सुधारतील.

धनु राशीच्या व्यक्तींना शिवरात्री सकारात्मक ठरू शकेल. महादेवांच्या कृपेने एखाद्याला चांगला आणि इच्छित जीवनसाथी मिळू शकतो. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. व्यवसाय पुढे नेत असताना, इतर काही कामातही नशीब आजमावू शकता. समाजात सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंद राहील.

मकर राशीच्या व्यक्तींना शिवरात्री आनंददायी ठरू शकेल. आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकेल. धाडस आणि शौर्य वाढेल. विद्यार्थ्यांना चांगल्या संस्थेत प्रवेशाची संधी मिळू शकते. मित्र आणि नातेवाईकांकडून विशेष बातम्या मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शिवरात्री यशकारक ठरू शकेल.वडिलांकडून मदत मिळेल. सरकारी नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक आणि स्पर्धेशी संबंधित लोकांसाठी चांगली बातमी मिळू शकेल. कार्यक्षेत्रात शिवाच्या कृपेने अनुकूल वातावरण तयार होऊ शकेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.