भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:35 AM2024-10-14T09:35:44+5:302024-10-14T09:49:32+5:30

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024 Astrology: भौम प्रदोष व्रतदिनी कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024: व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा चातुर्मासाचा काळ सुरू आहे. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कोजागरी नवान्न पौर्णिमा साजरी होणार आहे. तत्पूर्वी भौम प्रदोष व्रत आहे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते.

भौम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी प्रदोष असल्याने या दिवशी महादेवांच्या पूजेसह हनुमानाची पूजा, हनुमंतांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे.

हनुमंतांची उपासनाही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव, मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल? कोणत्या राशींवर महादेव शिवशंकर, मंगळ ग्रह, हनुमंतांची असीम कृपा असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: नोकरी-व्यवसायात नवनवीन संधी मिळतील. कशात ना कशात व्यग्र राहाल. बरेच परिश्रम करावे लागतील. हळूहळू परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार मिळतील. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यातून नवीन माहिती मिळेल.

वृषभ: भाग्याची चांगली साथ मिळेल. महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. जागरूक राहणे गरजेचे राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सतत कामे करीत राहावे लागेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. देवाणघेवाण करताना काळजी घ्या. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नियोजित कार्यक्रमात बदल होतील.

मिथुन: अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जबाबदारीचे काम करावे लागेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. अनेक अडचणी दूर होतील. राहु चंद्र व नेपच्यून युतीमुळे कार्यक्षेत्रात काही आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. मात्र, संयमाने वागून त्यातून मार्ग काढाल. त्यानंतर लाभदायक परिस्थिती राहील.

कर्क: उत्साहाने कामे हाती घ्याल. इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. समाजसेवा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. लोक तुमच्या चुका काढतील. त्यामुळे उत्साह कमी होईल. मुलांचे कौतुक होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. नोकरीत शुभ फळे मिळतील काहींना बढती मिळू शकते. घरात मंगलकार्य ठरेल.

सिंह: व्यवसायात आक्रमक धोरण राहील. यश मिळेल. लोक दुखावले जातील. स्वतःच्या व्यक्त्तिमत्त्वात विलक्षण बदल करण्यासाठी वेळ द्याल. काही लोक विरोधात कारवाया करतील. दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. इतरांना मदत करण्याच्या नादात घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. बोलणे प्रभावी ठरेल. समाजात तुमचा मान वाढेल. इतरांच्या भानगडीत जास्त गुंतू नका.

कन्या: आत्मविश्वासात वाढ झालेली दिसू शकेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सतत व्यग्र राहाल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. समाजात गौरव होईल. कामाची दखल घेतली जाईल. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. व्यवहार जपून करावे लागतील.

तूळ: एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो. काही लोक गुप्तपणे विरोधात कारवाया करतील. ताकही फुंकून प्यायले पाहिजे. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. तब्येतीची काळजी घ्या. एखादे काम रेंगाळत पडू शकते. हाताखालच्या लोकांना फार ढील देऊ नका. अधिकारी वर्गाशी जुळवून घ्या.

वृश्चिक: काही चांगले अनुभव येतील. कामे गती घेतील. फार गवगवा न करता कामे कशी होतील यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्ण करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. मुलांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्या. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. सामाजिक कार्यात सहभाग व्हाल. काही लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. मात्र लवकरच त्यांचे मनसुबे हवेत विरतील.

धनु: प्रगतीला पूरक ग्रहमान राहील. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्रक मिळू शकते. झटपट महत्त्वाची कामे आटोपून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च होईल. व्यावसायिक गुंतवणूकविषयक निर्णय घेताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. मुलांची प्रगती होईल. घरात किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. भावंडांशी सबुरीने वागा.

मकर: नोकरीत महत्त्व वाढेल. बोलण्याचा प्रभाव पडेल. मोठे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण कराल. शुक्र ग्रहामुळे आर्थिक लाभ होतील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भावंडांशी किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. व्यवसायात बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. प्रवासात सतर्क राहा.

कुंभ: प्रतिष्ठा प्राप्त होईल. काही अडचणी येऊ शकतील. लवकरच त्यातून मार्ग निघेल. कौशल्याला वाव मिळेल. पगारवाढ व इतर अनेक लाभ देणारे ठरू शकेल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. नवीन शिकण्यासाठी वेळ द्याल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात काही अडचणी येतील. व्यवसायात भरभराट होईल.

मीन: शुक्र ग्रहाची अनुकूल फळे मिळतील. कलाकार मंडळींना अनुकूल वातावरण राहील. मौजमजा करण्यासाठी पैसा व वेळ मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. घरात वादविवाद टाळा. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपण वागण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.