Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील! By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:55 PM 2024-10-22T13:55:42+5:30 2024-10-22T14:00:56+5:30
Astro Tips: अनेक विवाहेच्छुक मंडळी दिवाळी होता होता बोहोल्यावर चढण्याच्या तयारीत असतील. पण त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे जोडीदार! त्यासाठी युद्ध पातळीवर शोधही सुरु असेल. कोणाची लग्न गाठ कुठे, कधी आणि कशी जुळेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहणे, शोध मोहीम सुरु ठेवणे एवढेच आपल्या हाती असते. अशातच आपल्या स्वभावाला अनुकूल जोडीदार मिळाला तर सगळ्यांनाच नशिबाचा हेवा वाटतो. ज्योतिष शास्त्राने अशाच काही राशींचे भाकीत वर्तवले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पुढील राशीच्या मुली आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. अर्थात तसे असले म्हणून याच राशीच्या मुली शोधायच्या असा हट्ट धरू नका, कारण तिची रास तुमच्या राशीची मित्र रास आणि इतर गुणमिलनही महत्त्वाचे असते. आणि सगळे काही जुळून येईलही पण मन जुळणे जास्त महत्त्वाचे आहे. इथे आपण फक्त ज्योतिष शास्त्राचे भाकीत जाणून घेत आहोत, बाकी प्रत्यक्ष अनुभव जे घेत आहेत तेच त्याबद्दल अधिकतर सांगू शकतील!
मिथुन : ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत स्वतःला झोकून देतात. ज्याच्याशी एकदा नाते जुळले, त्याच्यी आयुष्यभर साथ देतात. आपण जेवढे प्रेम करतो तेवढेच जोडीदाराने आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी त्या जोडीदाराचे मन रिझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे शेअरिंग करायला आवडते आणि तेवढीच पारदर्शकता जोडीदाराकडूनही अपेक्षित असते.
सिंह : सिंह राशीच्या स्वभावाने कडक पण जोडीदाराच्या बाबतीत झुकते माप घेतात. आपाल्या आवडी निवडी सांगून त्या जोडीदाराकडून सगळ्या इच्छांची पूर्तता करून घेतात. त्यांना शिस्तबद्धता आवडते म्हणून काही वेळा त्या जोडीदाराशी कठोर शिक्षकासारख्या वागतात, पण त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराला त्याच्या आयुष्यात विशेषतः करिअर मध्ये खूप लाभ होतो. जोडीदाराशी त्यांचे अतूट नाते असते. त्या आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवतात आणि मिठीतही!
धनु : या राशीच्या मुली मनाने पारदर्शक असतात. त्या प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात. कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत व करून घेतही नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जो मुलगा या मुलींच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा, समाधान मानण्याचा, करिअरचा सर्वच बाबतीत दृष्टिकोन स्पष्ट असतो. त्यामुळे त्यांची स्थिर वृत्ती जोडीदाराला सुख दुःखात साथ आणि धीर देणारी ठरते. त्या आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या आवडी निवडीची काळजी घेतात. त्यांना संसार सुख चांगले मिळते.
मकर : मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची, आवडी-निवडीची चांगली काळजी घेतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या ठायी समर्पणाची भावना तीव्र असते. अनेक गोष्टी उशिरा मिळाल्याने त्यांच्या ठायी प्रचंड संयम बघायला मिळतो आणि हीच बाब त्यांना संसार सुखी करण्याचे बळ देतो. या राशीची जोडीदार तुमच्या वाट्याला आली असेल तर तुम्हीदेखील स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही.