Astro Tips: ग्रहपीडा, शत्रुपीडा,वास्तुदोष,पितृदोष,स्वभावदोष या सर्वावर रामबाण उपाय 'हे' एक स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:10 PM2023-05-16T12:10:18+5:302023-05-16T12:27:38+5:30

Vastu Tips: सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे की यात जितके प्राचीन मंत्र , नामसंग्रह , स्तोत्र , कवच इत्यादी संग्रहित आहेत त्या काही सामान्य कवींच्या रचना नसून बाह्य आणि अंतरजगताचे रहस्य जाणणाऱ्या भक्ती ज्ञान योग आणि तंत्राच्या साधनात सिद्ध , अनुभवी तत्ववेत्ता पंडितांद्वारे प्रस्तुत केल्या गेल्या आहेत. पैकी विष्णू सहस्त्र नाम हेदेखील असेच प्रभावी स्तोत्र आहे. श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्राच्या रुपात पितामह भीष्मांसारख्या महापुरुषांनी आपल्याला एक असेच परम सत्य , सुंदर , परम आनंदप्रद अमूल्य साधन दिले आहे ज्याचा लाभ घेऊन कोणीही अंतर्बाह्य समृद्धीनं संपन्न होऊन आपलं संपूर्ण जीवन कृतार्थ करू शकतो. कसे ते सविस्तर जाणून घेऊ.

४० दिवसांच्या रोज १२ वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात. १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात सांगतात.

दर बुधवारी ४ वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते. तसेच नियमित रोज १२ वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.

एकादशीच्या रात्री १२ वाजता स्नान करून विष्णुपुढे (राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको) तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२ एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .

सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.

वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.

बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.

श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.

बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते

घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.

विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.

श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे नित्य पठन करेल त्याला महादानाचे पुण्य मिळेल!

पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.

आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४ वेळा नारायण, नारायण नारायण नारायण असे नाम घ्यावे.

शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.