Astrology: या राशींसाठी नवे वर्ष प्रतिकूल, सुरू होईल कठीण काळ करावा लागू शकतो अनेक अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:51 PM2022-12-01T14:51:50+5:302022-12-01T14:56:04+5:30

Astrology: आज डिसेंबरची १ तारीख. आता २०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही मोजकेच दिवस उरले आहेत. नवे वर्ष सुख समृद्धी घेऊन यावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मात्र काही राशीच्या व्यक्तींना येणारं नववर्षं हे प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे.

आज डिसेंबरची १ तारीख. आता २०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही मोजकेच दिवस उरले आहेत. नवे वर्ष सुख समृद्धी घेऊन यावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मात्र काही राशीच्या व्यक्तींना येणारं नववर्षं हे प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार नव्या वर्षात १७ जानेवारी रोजी शनी कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यांच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम पाच राशींवर होणार आहे. त्यातील तीन राशींवर साडेसातीचा परिणम होईल. तर दोन राशींवर शनीची छाया सुरू होईल.

शनीचे कुंभ राशीमध्ये परिवर्तन सुरू झाल्यावर मकर राशीच्या लोकांमध्ये साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल. त्या परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा काळ खूप कठीण असू शकतो.

जानेवारी महिन्यापासून कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तींना खूप सावध राहावे लागेल. नोकरदार आणि व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात अडीच वर्षांचा काळ असतो. शनीने रास बदलल्यानंतर मीन राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. अशा परिस्थितीत मीन राशीच्या व्यक्तींना खूप कष्टांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत त्यांनी आतापासूनच सतर्क होऊन उपाय सुरू केले पाहिजेत.

शनीच्या रास बदलण्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर ढैय्या सुरू होईल. नोकरी आणि व्यवसायाबाबत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वादविवाद आणि लढाई झगड्यापासून दूर राहा. शनिदेवाच्या कोपापासून दूर राहण्यासाठी पूजापाठ करा.

शनीच्या राशी परिवर्तनामुळे कर्क रासीच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होईल. कर्कराशीच्या व्यक्तींवर शनीची ढैय्या सुरू होईल. अशा परिस्थितीत खूप खबरदारी बाळगली पाहिजे. या काळात आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पैशाच्या बाबतीत खबरदारी बाळगा. आरोग्यावरही विशेष लक्ष द्या. (ही माहिती सामान्य समजुती आणि माहितीच्या आधारावर दिली आहे. लोकमत.कॉम त्याला दुजोरा देत नाही.)