Astrology : गुरुबळ कमी पडत असल्याने कामात अडथळे? १२ ज्योतिष शास्त्रीय उपाय लगेच सुरु करा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 07:00 AM 2024-04-25T07:00:00+5:30 2024-04-25T07:00:02+5:30
Astro Tips: कुंडलीतील गुरुबळ चांगले असेल तर कामं निर्विघ्नपणे पार पडतात. एवढेच नाही तर आपल्या क्षेत्रात प्रगतीची दारेही खुली होतात. म्हणून गुरुबळ वाढवा असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देतात. पण ते वाढवायचे कसे? तर मुख्यत्त्वे दत्त गुरूंची उपासना सांगितली जाते, त्याबरोबरच दैनंदिन जीवनात काही नियमांचे पालन करावे लागते याबद्दल ज्योतिष मित्र मिलिंद यांनी संकलित केलेले नियम जाणून घेऊ! १. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करुन शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुचे नामस्मरण करावे. पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे.
२. शीघ्र विवाहासाठी गुरुवारी उपास करावा विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे.. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे.
३. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.
४. घरातून दारिद्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषतः स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.
५. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास, गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे पिवळे फुल, पिवळे पकवान्न, फळं, कपडे ई. वस्तू दान कराव्या. निःशुल्क सेवा करावी.
६. हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधावे.
७. २७ गुरुवार पर्यंत केशराचा टिळा लावणे आणि केशरची पुडी पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा कागदात आपल्या आसपास ठेवावी. जीभ व बेंबीवर केशराचे गंध लावावे.
८. घरात सूर्यफुलाचे रोप लावावे. आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि प्रगति होईल.
९. व्यक्तीला माता-पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यक्तींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवावा. एकत्र कुटुंबात राहावे.
१०. गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घालावी.
११. गुरुवारच्या दिवशी 'ॐ बृं बृहस्पतये नमः!' मंत्राचा जप करावा. गुरुप्रदोष व्रत करावे.
१२. गुरुच्या संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुचे नक्षत्र (पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा) आणि गुरूच्या होरा मध्ये केल्यास जास्त उत्तम.