‘या’ ५ राशीचे लोक घेतात बॉसशी पंगा; पाहा, नोकरीत यश, प्रगतीसाठीचे खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:58 PM2022-04-26T18:58:13+5:302022-04-26T19:04:14+5:30

ज्योतिषशास्त्रात १२ राशींचे वर्णन केले आहे. यासोबतच या सर्व १२ राशींची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि उणीवादेखील सांगितल्या आहेत.

योतिषशास्त्रात १२ राशींचे वर्णन केले आहे. यासोबतच या सर्व १२ राशींची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि उणीवादेखील सांगितल्या आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार अशा पाच राशी आहेत, ज्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत जमवून घेण्यास समस्या येत असतात. आपण या ठिकाणी नोकरीत यश, प्रगती होण्यासाठी काही उपायदेखील पाहणार आहेत. पाहूयात कोणत्या आहेत या पाच राशी.

मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. अनेक वेळा या राशीचे लोक कामाच्या ठिकाणीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. या लोकांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. याच कारणामुळे कधीकधी त्यांचं बॉस आणि इतर सहकाऱ्यांशी जुळत नाही. यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावं लागतं. उपाय - नियमितपणे सूर्याला अर्घ्य द्यावे. याशिवाय हनुमान चालीसा पठणही तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल.

वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. अनेक वेळा या लोकांमध्ये त्यांच्या बॉसविरोधात सूडाची भावना दिसून येते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही आणि मग त्यांचे कामही वेळेवर पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वतःमध्ये सूडाची भावना असल्याने काही वेळा त्यांना अधिकार्‍यांशी नीट समन्वय साधता येत नाही. अशा परिस्थितीत मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करणे आणि कोणतीही गोष्ट मनात ठेवून बसण्याची वृत्ती सोडणं आवश्यक आहे. यासाठी उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालीसाचं पठणही करू शकता.

धनु ही गुरूची रास आहे. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. परंतु, या लोकांना अनेक गोष्टींचा राग येतो आणि काही वेळा ते आपल्या अधिकार्‍यांनी सांगितलेल्या गोष्टीही नीट समजून घेत नाहीत. स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात. या स्वभावामुळे या लोकांना नोकरीमध्ये वारंवार बदल करावे लागतात. उपाय - रविवारच्या दिवशी भगवान विष्णूना दीप दाखवा. याशिवाय रसूर्य चालीसाचं पठण करा.

मकर ही शनीची रास आहे. तसंच सूर्य आणि शनि यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या अधिकारी किंवा बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर एखाद्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती योग्य नसेल तर ते आपल्या जोडीदाराशीदेखील सुसंवाद ठेवू शकत नाहीत. यासोबतच या राशीचे लोक एकांतातही राहण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक रागावतातही. उपाय - शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. याशिवाय सूर्योदयाच्या वेळी सूर्याला दीप दाखवा. याशिवाय सोमवारी गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घाला.

मीन ही गुरूची रास आहे. या राशीचे लोक स्वतःमध्ये हरवलेले असतात. यामुळे अनेकवेळा त्यांना गोष्टी व्यवस्थितपणे हाताळण्यात समस्या येतात, तर या लोकांमध्ये काम टाळण्याची वृत्तीही दिसून येते. या लोकांना आपल्या अधिकार्‍यांचे म्हणणेही नीट समजत नाही. अनेकदा हे लोक व्यवहारीही नसल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उपाय - तुम्ही रविवारी सूर्य चालीसाचं पठण करू शकता. याशिवाय आदित्य हृदय स्तोत्राचे पठणही करणं लाभदायक ठरू शकतं.