४ राशींवर असते हनुमानाची विशेष कृपा: आहेत प्रिय राशी, संकटे येत नाहीत, लाभच लाभ होतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:24 PM2023-06-02T12:24:31+5:302023-06-02T12:34:20+5:30

तुमची रास कोणती? कोणत्या राशींना हनुमंतांचे शुभाशिर्वाद अन् अपार कृपा लाभते? जाणून घ्या...

हनुमंतांचे नुसते नाव घेतले तरी शक्ती संचारल्यासारखे वाटते. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्ती अन् सामर्थ्याचे दैवत मानल्या गेलेल्या हनुमान, बजरंगबलीचे देशभरात पूजन केले जाते. केवळ शक्ती नाही, प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर हनुमंतांनी अनेक कार्ये करून दाखवली आहेत. हनुमंत चिरंजीव मानले गेले आहेत. ते आजही आपल्यात असल्याची कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे.

देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये हनुमंतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना केली जाते. मंगळवार, शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शनी साडेसाती, शनीदोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी हनुमंतांचे पूजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमंतांच्या काही प्रिय राशी सांगितल्या गेल्या आहेत.

हनुमानजींची मनापासून पूजा करणाऱ्याला त्यांचा कृपाशिर्वाद मिळतो, असे म्हणतात. हनुमंतांना संकटमोचक म्हटले जाते. हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार एकूण ४ राशी आहेत ज्या भगवान हनुमानाला खूप प्रिय आहेत आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच मिळतो, असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या चार राशी, तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

मेष ही हनुमंतांची प्रिय रास मानली जाते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. हनुमानजींची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे म्हटले जाते. या लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता असल्याचे म्हटले जाते. भगवान हनुमान त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात, असे मानले जाते. कौशल्य, ज्ञान आणि चतुराईने पैसे कमवू शकतात. या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी, असे केल्याने सर्व संकट दूर होऊ शकतात. सौभाग्य प्राप्त होऊ शकते. कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सिंह ही हनुमानाची प्रिय रास मानली गेली आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. हनुमानजींची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे म्हटले जाते. या राशीच्या लोकांचे जीवनातील समस्यांपासून बजरंगबली संरक्षण करतात. हनुमानजींच्या कृपेने पैशांचा ओघ सुरू राहतो. हनुमानजींच्या कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ते करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात. या व्यक्तींना हनुमानजींच्या कृपेने विशेष लाभ होतो, नेतृत्व क्षमता वाढीस लागते. हनुमानजींची पूजा केल्याने या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या लगेच दूर होतात, अशी मान्यता आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांची विशेष कृपा असते, असे म्हटले जाते. हनुमानाच्या कृपेने या राशीचे लोक त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेने कामे यशस्वी होऊ शकतात. ती फलदायी ठरू शकतात. या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. तसेच, आर्थिक स्त्रोतांच्या कमतरतेचा फटका बसत नाही, असे म्हटले जाते.

कुंभ राशीच्या लोकांवर विशेष हनुमानांचा आशीर्वाद असतो. या राशीच्या लोकांना हनुमानजी अतिरिक्त लाभ देतात, असे म्हटले जाते. या राशीचे लोक त्यांच्या सर्व कामात भरभराट करतात. बजरंगबली कृपेने त्यांचे कार्य अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकते. हे लोक आनंदी, समृद्ध जीवन जगतात. त्यांची आर्थिक स्थितीही अनुकूल असते. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे हनुमानजींची पूजा केली तर ते लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे या लोकांना दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाण्याचा सल्ला दिला जातो.

सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.