Astrology Tips: नवग्रह दोष निवारणासाठी जाणून घ्या उपाय; अन्न आणि अत्तर संतुलित वापराचा होईल मोठा उपयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:49 PM2023-12-11T13:49:39+5:302023-12-11T13:53:33+5:30

Navagraha Dosha: कुंडलीतील जे कमकुवत ग्रह आहेत किंवा त्यांच्या भ्रष्ट स्थानामुळे कुंडली दोष निर्माण होत आहे, अशा ग्रहांना शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. जसे की रत्न धारण करणे, मंत्र, यंत्र, दान, जप, विविध प्रकारचे कर्मकांड इ. करणे. विद्वानांचे म्हणणे आहे की या उपचार पद्धतीचा अवलंब केल्याने नवग्रह दोष दूर होतात. सदर लेखात आपण अत्तर आणि अन्न यांचा सुयोग्य वापर करून ग्रहांची अनुकूलता कशी मिळेल ते जाणून घेऊ.

 सूर्य - कुंडलीतील रवी दोष अर्थात सूर्यासंबंधीचे दोष दूर केल्याने आत्मविश्वास वाढतो. सूर्य ग्रह अनुकूल होण्यासाठी, आहारात केशर, गहू, आंबा आणि मध वापरणे आवश्यक आहे. तसेच सूर्यपूजेत अत्तर, कुंकू आणि गुलाबपुष्प यांचा वापर केल्याने मोठा लाभ होतो.

 चंद्र - चंद्र हा मनाचा कारक आणि जल तत्वाचा प्रतिनिधी आहे. जीवन आनंदी आणि निरोगी बनवतो. याचा मानसिक शांततेशीही संबंध आहे. चंद्राच्या अनुकूलतेसाठी ऊस, पांढरा गूळ किंवा साखर, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मीठ आणि मिठाई यांचा आहारात नक्कीच समावेश करावा. जाई आणि रातराणीची फुलं, अत्तर यांचा दैनंदिन वापर करावा.

 मंगळ - मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे. मंगळाची व्यक्ती मसालेदार आणि तिखट आहार करणे पसंत करते आणि ते त्यांच्या प्रकृतीसाठी पोषक ठरते. मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी मूग आणि मूग डाळ, चहा, गूळ, मसूर, धान्य, कॉफी, कोको, लाल मोहरी, बार्ली आणि तूप यांचा आहारात वापर करावा. अत्तर, तेल किंवा लाल चंदनाचा सुगंध मंगळाला प्रसन्न करतो. लोभानचा सुवासही वापरता दैनंदिन जीवनात समाविष्ट करता येतो.

 बुध - बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आणि मिश्र रस प्रबळ ग्रह आहे. बुधाला वेलची सर्वात जास्त आवडते. बुधाला निलगिरी, वेलची आणि चंपा यांचा सुवासही आवडतो. बुध ग्रहाच्या दृष्टीकोनातून चंपा अत्तर किंवा तेलाने स्नान करणे चांगले आहे. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी वाटाणा, ज्वारी, हिरवी कडधान्ये, पेरू आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

 बृहस्पति - बृहस्पति हा मोठा आणि समृद्धी देणारा आहे. गुरूच्या अनुकूलतेसाठी आहारात हरभरा, हरभरा डाळ, बेसन, मका, केळी, हळद, खडे मीठ, पिवळी कडधान्ये यांचा समावेश करावा. आणि फळांचा समावेश असावा. पिवळ्या फुलांचा सुगंध, केशर आणि केवडा अत्तर देखील गुरुची अनुकूलता वाढवतो. गुग्गुळचाही वापर करता येईल.

 शुक्र - शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु! शुक्र हा तामसी, राजसी ग्रह आहे. तो योग्य स्थानी असेल तर ऐहिक सुखं मिळतात. शुक्र ग्रहाला सुगंध खूप आवडतो. आहारात तांदूळ, दही, त्रिफळा, दालचिनी, जर्दाळू, कमळाच्या बिया, साखर मिठाई, मुळा यांचा वापर शुक्राचे स्थान बळकट करतो. पांढरी फुले, चंदन आणि कापूर यांचा सुगंध लाभदायक ठरतो. शुक्र अनुकूल व्हावा म्हणून कापूर रोज संध्याकाळी लावावा.

 शनि - शनीवर वायु तत्वाचे वर्चस्व आहे, त्याला तेलासह तिखट रस आवडतात. शनीच्या आशीर्वादासाठी व्यक्तीने तीळ, उडीद, काळी मिरी, जवस आणि शेंगदाण्याचे तेल, लोणचे, लवंग, तमालपत्र आणि काळे मीठ यांचा आहारात वापर करावा. शनीला कस्तुरी, लोबान यांचा सुगंध आवडतो. हे अत्तर तुमहाला शनी दोष दूर करण्यास मदत करतील.

 राहु - राहू शनि प्रमाणे आणि केतू मंगळ सारखा मानला जातो, तरीही उडीद, तीळ, गूळ आणि रस हे राहू-केतूच्या त्रासात आराम देतात. त्याला लोबान आणि कस्तुरी प्रिय आहेत. गाईचे तूप वापरल्याने राहू-केतूच्या त्रासातुनही मुक्ती मिळते. मात्र त्याचा नियमीत वापर व्हायला हवा.